आहेस तू एक राजकुमारी,
जशी एखादी स्वप्नपरी.
दिसणं तुझं मी कसं सांगणार?
सौंदर्य तुझं शब्दातं कसं बांधणार?
हरणालाही लाजवतील,
असे डोळे आहेत तुझे.
गुलाबाच्या पाकळ्यांसारखे,
कोमल ओठ आहेत तुझे.
वाटतं तुझ्या या मोकळ्या केसांत,
वारा बनून फिरावं.
हळूच कानाजवळ जाऊन,
मनातलं गुपित तुला सांगावं.
पण हा तर माझ्या मनाचा खेळ आहे,
तुझ्याच हातात आपला मेळ आहे.
ठरव आता तूच…
मला असा एकटाच सोडणार…
की आयुष्यभर माझी साथ देणार?
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment