Friday, June 25, 2010

§§ वाट पाहतो तुझी मी…§§

किती दिवस वाट पाहतोय,

आता तरी येशील का?

डोळे आहेत तुझ्या वाटेवर,

त्यांचे पारणे फ़ेडशील का?



ते दिवसही गेले,

वेळही “ती” निघून गेली.

तरीसुध्दा तुझ्या मनात,

माझ्यासाठी जागा नाही का झाली?



तू येशील, मला भेटशील,

एवढाच विचार मनात आहे.

तुझ्या माझ्या आयुष्याची,

स्वप्नं मी रंगवतो आहे.



पण चांदण्यांची शोभा ही,

त्या चंद्राच्या येण्यानेच आहे

तशीच माझी ही स्वप्नांची दुनिया

तुझ्याशिवाय अपूर्ण आहे.



म्हणून जरा विचार कर,

माझ्या या वेड्या मनाचा.

वाटलच तुला जर काही,

तर निश्चय कर भेटण्याचा…..

No comments: