काय बोलू कसे बोलू,
शब्द माझे अबोल झाले
तुझ्याविना असे एकटे,
जगणेच मला अशक़्य झाले.
जवल आहेत आपल्या आठवणी,
आठवतो आहे तुझा सहवास.
तुच आहेस ध्यानी-मनी,
ह्रदयात फ़क़्त तुझाच निवास.
तुझ्यासाठी जगतो आहे,
तुझ्यासाठीच जगणार आहे.
आपल्या भेटीसाठी येणारा,
प्रत्येक क्षण मोजणार आहे..
तरीही “हा दूरावा”
आपल्यामध्ये राहणार आहे.
कधी तुला तर कधी मला,
रोज रोज सतावणार आहे.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment