Friday, June 25, 2010

§§ दुबळी ही जीवनगाडी….§§

व्यर्थही नव्हते विचार माझे,

अर्थही होता वचनांना पण,

आज व्यर्थही नाही,अर्थही नाही,

दूबळी ही जीवनगाडी, आज पुढे का सरकेना?



स्वप्नही एक पाहीले होते,

रंग तिने त्यातब भरले होते.

आज स्वप्नही नाही, ‘ति’ पण नाही,

रात्र पसरली भोवती पण, झोप मला का येईना??



एक प्रश्न होते आयुष्य माझे,

त्याचे उत्तर ती बनून आली.

आज परत तिथेच उभा मी,

तेच प्रश्न घेउन पण, उत्तर का मज सापडेना??



गंध होता तिच्यासव जगण्याला,

फुले अगणिक बहरली होती.

आज शोधितो मी तोच गंध,

आठवितो त्या फुलांना पण,

कोमेजलेले जीवनफुल माझे,

काही केल्या उमलेना…..

दुबळी ही जीवनगाडी, आज पुढे का सरकेना???

No comments: