हवे आहेत डोळे तुझे,
माझी स्वप्न पाहण्यासाठी…
हवे आहेत हात तुझे,
माझ्या आयुष्यरेखा उमट्ण्यासाठी…
हवं आहे हसणं तुझं,
या जीवनाच्या ताजेपणासाठी….
हवं आहे रुसणं तुझं,
थोड्या-फार चेष्टेसाठी…..
हवी आहे हाक तुझी
सोडून सगळं परत येण्यासाठी
हवी आहे मिठी तुझी,
या जगाचा विसर पडण्यासाठी…
………….
…………………….
अशा किती गोष्टी सांगू तुझ्या,
ज्या हव्या आहेत मला जगण्यासाठी..
तु कितीही, काहीही म्हण,
पण जगतोय मी तुझ्यासाठीच…
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment