कसं समजावू तुला,
किती प्रेम करतो मी?
कसं सांगू तुला,
तुझ्यावर किती मरतो मी?
तू माझ्याजवळ नसतेस,
तेव्हा एकटाच बडबडतो मी.
आरशासमोर उभा राहून,
स्वतःशीच बोलत राहतो मी.
कधी वाटतं तुझ्याशी खूप बोलावं,
कधी वाटतं तुला पाहताना तुझ्यातच रमावं,
कधी वाटतं तुझं बोलणं ऎकतच रहावं,
माझा विचार तरी आहे का तुझ्या मनात,
हे तुझ्या बोलण्यातून मला कळावं.
तू काहीच बोलली नाहीस,
की मन माझं नाराज होतं.
समजशील तू माझ्या प्रेमाला
एवढीच अपेक्षा ते करतं
जगाची बंधनं ही तर सर्वांवर आहेत,
पण त्यातुनही मला तुझ्या प्रेमाचा आधार दे,
नाहीतर या जगाचा विचारच सोडून दे
कारण तुझी आतुरतेनं वाट पाहतोय मी,
आता तरी कळेल का तुला,
तुझ्यावर किती प्रेम करतो मी?
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment