थोडी होतीस तू माझी,
थोडा होतो मी तुझा.
पण प्रेम केले फक़्त मी,
हाच दोष होता माझा.
प्रेम तर सगलेच करतात,
मीही तुझ्यावर केलं.
काहीजण न सांगताच समजतांत,
पण तुला मी सांगूनही नाही कळालं..
वाट तुझी पाहताना,
जीव माझा झुरत होता.
येणऱ्या प्रत्येक नकारावेळी,
तीळ-तीळ तुटत होता.
मलाही कळून चुकलयं आता,
तू माझी होणार नाहीस.
कारण तुझं मन बदलणं,
आता माझ्या हातांत राहीलं नाही.
पण तू माझी झाली नाहीस,
म्हणून माझं जीवन संपणार नाही.
कदर नसली तुला जरी माझी तरी,
मी तुला कधीच विसरणार नाही.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment