असं काय कारण आहे,
की मी तुला विसरूच शकत नाही.
तुझ्यातच गुंतलय हे मन,
दूसरा विचारच करत नाही.
तूच माझी शेवटची इच्छा,
तूच आहेस माझं जीवन.
तुझ्याशिवाय या जगात,
एकटंच भटकतयं हे मन.
वाट तूझी पाहून पाहून,
श्वास माझे थकले आहेत.
“तू” येशील याच आशेवर,
डोळे लावुन बसले आहेत.
आता माझ्या आयुष्यात,
जगणं कमीच उरलं आहे.
वृक्ष तर कधीच कोरडा झाला,
आता मुळंसुध्दा वठली आहेत.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment