Friday, June 25, 2010

§§ प्रेम….§§

ध्यानी मनी काही नसताना,

ह्रदयात कहीतरी होतं.

सगळं काही सुरु असताना,

मनं मात्रं दूसरीकडेच असतं….



सारखं वाटत असतं,

जाऊन तिला पहावं.

मनात एक वेडी आशा…..

तिनेही इकडेच बघावं



मनाच्या या गोंधळात वाटतं,

एकदातरी तिच्याशी बोलावं.

मनातल्या प्रेमाच्या घरात,

तिला हळूचं बोलवावं.



पण, पुऩ्हा मनात वाटतं,

थोडी वाट पहावं.

…..असं हे प्रेम असतं,

जे प्रत्येकाने अनुभवावं

No comments: