प्रेम करत असुनसुध्दा,
काहीच सांगू शकत नाही.
माझ्या मनाची व्यथा,
तुझ्यासमोर मांडू शकत नाही
कधीकधी नशीबसुध्दा,
विचित्र खेळ खेळतं.
जायचं नसत ज्या वाटेला,
तिच वाट पक्की करतं.
नाही म्हणालो मी तरी,
आता मनावर ताबा नाही.
रमवलं दुसरीकडे त्याला तरी,
आठवण काढल्याशिवाय रहात नाही.
मी प्रेम केलं हे नक्की
पण मी आता बोलू शकत नाही.
खुलली नाही जर तुझ्या ओठांची कळी,
तर फूल आपल्या स्वप्नांचे
कधीच फुलणार नाही
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment