पाहिलं तूला तेव्हा वाटलं नाही,
मी तुझ्यावर कधी प्रेम करेन.
“त्या” प्रेमापासून दूर असणारा मी,
तुझ्यामुळे स्वतःलासुध्दा विसरेन !!
ओळख झाली मैत्री झाली,
गाठभेट आपली रोजचीच झाली.
या वाढत्या सहवासामुळे,
तुझी आयुष्यात गरज निर्माण झाली !
दिसली नाहीस एक दिवस,
की मला काहीच सुचत नाही.
तुझ्याशिवाय या मनात,
दूसरा विचारच येत नाही.
प्रेम करत असलो तरी,
शब्द माझे अबोल आहेत.
समजशील तू मला म्हणून,
तुझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment