वृक्ष माझा कोरडा असला तरी,
जगण्याची उमेद संपलेली नाही.
वादळ-वारा पावसांतदेखील,
त्यानं आपली जागा सोडलेली नाही.
येणाऱ्या ऋतुमध्ये तो बहरणांर,
याची त्याला खात्री आहे.
फुलांशी आणि फुलपाखरांशी तर,
त्याची खूप जूनी मैत्री आहे.
वर्षा राणीने घात केला म्हणून काय झाले,
श्रावणधारा तरी नक्कीच येतील.
जगण्याच्या या उमेदीला,
नवीन आयुष्य देउन जातील.
प्रतिक्षा आहे थोड्या दिवसांची,
मग बघ “तो” पुऩ्हा बहरेल.
काळजावर स्वतःच्या दगड ठेवून,
तो मागच्या आठवणी विसरेल.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment