Friday, June 25, 2010

§§ ही वेळ सुर्यास्ताची.. §§

ही वेळ आहे सूर्यास्ताची,

ही वेळ, तुझ्या माझ्या आठवणींची.



ह्या वेळी, वाऱ्याची मंद झुळूक,

माझ्याभोवती फिरत राहते.

हळूच मला कवटाळून,

तुझ्या स्पर्शाची जाणीव देते….

……अशी ही वेळ संध्याकाळची,

आठवण आपल्या भेटींची….



या भेटींमुळेच आपण,

दिवसेंदिवस जवळ आलो.

थोडा मी……थोडी तू

एकमेकांत गुंतत गेलो



पण…

मनातली गोष्ट ऒठांवर येणे,

हे दोघांसाठीही गरजेचे आहे.

आणि त्यासाठी अजुन एक संध्याकाळ,

तेवढीच गरजेची आहे…

वाट पाहेन मी.… “त्या” भेटीची,

वाट पाहेन…..त्या सर्वात सुंदर सुर्यास्ताची.



--- तुषार.

No comments: