सुंदर आहे ही संध्याकाळ,
मोहक आहेत आकाशाचे रंग.
परतंत आहेत घरट्याकडे पक्षी,
सजवले त्यांनी सुर्यप्रतिबिंब.
सुर्याचा हा अस्त, ही कातरवेळ,
नभामध्ये सुरू आहे, ढगांचा खेळ.
मंद आहे वारा, पसरला आहे सुवास,
मनाला हवा आहे, कोणाचा तरी सहवास.
हा अस्ताला जणारा सूर्य,
काय बरे सुचवत आहे ??
…बहूतेक…..तो माझ्या…
एकटेपणास खिजवत आहे…
पण त्याचाच हा नियमं आहे,
आज जो मावळला, तो उद्या उगवणारं,
तसाच माझा हा एकटेपणा,
या वेळेबरोबर संपणार….
--- तुषार
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment