दूर राहूनही प्रेम कसं करायचं,
हे कधीतरी विचार मला.
नजरेसमोर नसूनही का जवळ असतेस माझ्या,
हे कधीतरी विचार माझ्या मनाला.
सोबत नेहमी असतात आपल्या आठवणी,
आणि फक्त त्यावरच मी जगतो.
आठवतो तुझं बोलणं, हसणं…ते जवळ घेणं,
आणि त्या सुंदर क्षणांमध्ये मी स्वतःला रमवतो.
आत्ता तू जवळ नाहीस म्हणून काय झालं,
आयुष्यभर तर तू जवळच राहणार आहेस.
अगं जीवसाथी म्हणून निवडलयं तुला,
तू तर माझी बायकॊ म्हणून मिरवणार आहेस !!
म्हणूनच सांगतोय अगं वेडे,
सांभाळ जरा तुझ्या मनाला.
तिकडे उदास असतेस तू,
पण ऒढ लागते या जीवाला.
वचन आहे माझं,
एक दिवस असा असेल.
रंग माझ्या प्रेमाचा,
तुझ्या हातावरच्या मेहंदीत असेल
आयुष्यभरासाठी जवळ असशील तू
आणि या विरहाच्या आठवणींमध्येच,
आपल्या दोघांचा संसार सामावेल.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment