वाट चुकलेले हे आयुष्य असे,
अंधारात चुकलेले जहाज जसे.
मनाला या विचारांचा अंत नसे
न उमलताच कोमेजलेले सुमन जसे.
का जाहला हा कोप मनावर,
का जाहले ते निश्चय हतबल.
प्रश्नांचे या शोधिता उत्तर,
चुक बरोबर काहिच नसे.
दिली होति वचने कोणितरी,
घेतल्या होत्तत्या शपथा कोठेतरी.
येता आठवण आज त्या दिसांची,
आयुष्याचा य अर्थच नसे.
असेल उद्या रास सुखांची,
रंगेल उद्या मैफ़ील स्वरांची
पण नसताना तू संग सखे,
त्या स्वरसुखाना गंध नसे
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment