Friday, June 25, 2010

§§ थंडीच्या या रात्रीमध्ये…. §§

या थंडीच्या रात्रींमध्ये,

तुझी खूप आठवण येते.

तुझ्यावरचं माझं प्रेम,

पुऩ्हा पुऩ्हा जागं करते



तुझ्या भेटीची आतुरता,

मनामध्ये काहूर माजवते

वाटतं ही थंडीची लाट,

माझ्या एकटेपणांस खिजवते.



हवीहवीशी तुझ्या मिठीतली उब,

या रजईत कशी येणार?

स्वर्गातल्या त्या अमृताची सर,

इथल्या मधात कशी जाणवणारं?



तरीसुद्धा या गुलाबी थंडीत,

मी, “ही” एकटी रात्र जागतो आहे.

तुझ्या भेटीसाठी येणारा,

प्रत्येक क्षण मोजतो आहे…..

No comments: