आठवण तुझी येते तेव्हा,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
विचार तुझा करता करता,
साऱ्या जगाला विसरून जातो.
आठवण तुझी येते तेव्हा,
मनं माझं, मला जाब विचारतं
माझी असूनही तू मझ्यापासून दूर का?
याचचं कारण ते मागतं.
आठवण तुझी येते तेव्हा,
डोळ्यातं थोडसं पाणी येतं.
हातावर दोन थेंब जरी पडले,
तरी त्यात तुलाच दाखवतं.
आठवण तुझी येते तेव्हा,
मन माझं अस्वस्थ होतं.
आठवण तुझी येते तेव्हा,
वाटतं हे जग सोडून द्यावं,
आणि तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा,
मी मरणाला जवळ करावं……
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment