सांगायचे आहे तुला ,
सुमनांचा पाऊस पडतो माझ्यावर,
तूझा केवळ चुकून स्पर्श झाला कि..
शमून जाते तहान कानांची,
तू एक जरी शब्द बोललास कि..
पूर्ण दिवस हसरा जातो माझा,
तू स्मित हसलास कि..
डोळे सुखावतात माझे,
तू फ़क़्त पाठमोरा दिसलास कि..
आता तू फ़क़्त कल्पना कर....,
काय अवस्था होत असेल माझी
तू दूर किंवा अदृश्य असलास कि.....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment