कधी कधी वाटते,
एका अशा ठिकाणी जावे,
"तो आणि मी"
सोबत दुसरे कुणीही नसावे,
वळण-वळणाची ती वाट असावी
हिरव्या-गर्द झाडांनी जी डुंबून जावी,
लाल मातीचा गंध असावा,
धुंद गंधाने त्याच्या
हवेत गारवा घुमावा,
हवेच्या नाजूक झुळकीने
मनाला माझ्या भेदून जावे,
स्पर्शाने तिच्या मग
हे देह अगदी रोमांचित व्हावे,
धुंद अशा त्या क्षणी
भाव-भावनांचे काहूर माजावे,
आणि मधुर मिठीत त्याच्या
माझे सर्व विश्व एकरूप व्हावे,
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment