Wednesday, November 18, 2009

सांजवेळ

दिवस चिंब भिजला
वळचणीला बसला
काळोखाच्या पदरात
उजेडही लपला

पाखरांचे पंख भिजले
वाऱ्याने जरा थरथरले
आडोश्या कोपऱ्यात
दोन जीव ओले
 
किर्रर्र रातकिड्यांची
टपटप पागोळयाची 
भरल्या नभात
कडकड विजेची

संध्या छाया  मंद
रातराणीचा धुंद गंध
लपलेला ढगात
चवथीचा चांद

मी शांत तुही गप्प
वाफाळता कॉफ़िचा कप
सांजेच्या डोळ्यात
अनिवार झोप 

डोळ्यांची गर्द निळाई
पाठीवरला तीळ मृण्मयी
मखमली झोपेत
पावसाची अंगाई

No comments: