आज ती होती.... मी होतो,पण नव्हते "ते" प्रेम... अन् "ते" नाते...भावना ही त्याच होत्या,पण बदलले होते "ते" विचार...दोघांच्या नज़राही त्याच होत्या,पण एकमेकांमध्ये त्या मिळवण्याची "ती" हिम्मत नव्हती....मनाला आस खुप होती,पण पुन्हा ठेस लावायची नव्हती....स्वप्ने तशी अनेकच होती,पण ती कधी पूर्ण होणारच नव्हती....ती समोर असुनही डोळे तिच्याकडे आज पहात नव्हते,कारण आज तिच्याबरोबर कुणी दुसरेच होते....डोळ्यात जरी अश्रु नव्हते,तरी मनात मात्र तिचीच आठवण होती....आज जरी ती देहाने माझी नव्हती,तरी हृदयाने सदैव ती माझीच होती..... अन् माझीच रहाणार...
No comments:
Post a Comment