कोठेतरी कुणाचे
कोठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहेआजन्म राहिलेला तो खोल घाव आहे."तेव्हा मुकाच होतो , आता मुकाचआहेआता मुकेपणाचा झाला सराव आहे."मी बोललोच नाही माझ्या व्यथाकुणालासोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे.जो तो इथे भुकेला जो तो इथेउपाशीप्रत्येक माणसाला आजन्म हाव आहे.कोठे मिळे दिलासा अन धीरहीकुणाचाठावे मला परंतू , सारा बनाव आहे."व्यापार चाललेला आहे इथेजिण्याचाआयुष्य सोसण्याचा भारीच भाव आहे."न्यायालयामधेही मी हारलोचबाजीफाशी मला न द्यावी ऐसा ठराव आहे.पत्तेच जीवनाचे झाले अखेर माझ्याअन विस्कटून गेला प्रत्येक डाव आहे......
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment