Thursday, August 14, 2008

असीम

खरे प्रेम करणार्‍यांना सीमा नसावीखुळे स्वप्न बघणार्‍यांना सीमा नसावीमार्ग चालुनी जे थकले झोपले इथेशीआसमंती उडणार्‍यांना सीमा नसावीतुझ्या आंधळ्या प्रेमाला नजर लागली का ?नजरेच्या नजराण्यांना सीमा नसावीकाल डाव तुमचा झाला आज जीत माझीपटावरी जगणार्‍यांना सीमा नसावीदेत घेत गेले सार्‍या मनोमनी भेटीआत्मदान करणार्‍यांना सीमा नसावीनाम तुझे घेण्या आधी ओठ थर्थरे का ?पुजेमधे रमणार्‍यांना सीमा नसावीभागवता आधी ज्यांना भेटे भगवंतभाग्यवंत भजणार्‍यांना सीमा नसावीखास खास असणार्‍यांचे भास सदा होतीआस पास असणार्‍यांना सीमा नसावीजुळे सूर आकाशाशी वेडुल्या मनाचास्वरांगीस भुलणार्‍यांना सीमा नसावीखरे प्रेम करणार्‍यांना सीमा नसावीखुळे स्वप्न बघणार्‍यांना सीमा नसावी

No comments: