तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहेतुला वाटले विसरुन जाईन जे जे सारे घडले आहेहसता हसता ठसका लागुन जर पाणी डोळ्यांतुन आलेसमज इथे मी वाट पाहुनी थकलेली पण उभीच आहे।जाता जाता कानापाशी कुजबुजल्याचा भास कधी जरझाला, तर तू समज इथे मी तडफ़डते बडबडते आहेतुला वाटले महिना दो महिन्यांनी मीही विसरुनच जाईनखुळ्या , भूक तू माझी, माझी तहानही तुजपाशी आहेतुला भरंवसा काळाच्या खपलीने सारे बुजून जाईलमला खातरी परतुन सारे येईल जे जे माझे आहेदर्भ बनुन बोहल्यावर तूझ्या जळेन मीही त्या होमावरगळेल पाणी तेव्हा म्हणशिल धूर किती हा छळतो आहेप्रेमाचे ते चार दिवस रे माझे सारे जगणे होतेस्मरणाचा तो अंतिम क्षण मरणाची माझ्या पहाट आहेतुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहेविसरुन जाणे शक्य नसे रे जे जे सारे घडले आहे
No comments:
Post a Comment