असे स्वप्न माझे तसे स्वप्न माझेतुझ्या भोवताली वसे स्वप्न माझेकुणाला कळेना तुझी ती महत्ताजगाला कळावी असे स्वप्न माझेतु झोपेत माझ्या तु स्वप्नात माझ्यातुझी झोप माझी तुझे स्वप्न माझेतुझ्या खोल आतून जे गीत येतेमी गुणगुण गाऊ जगे स्वप्न माझेअबोला तुझा रे असे जीवघेणानसे प्यास निद्रा रुसे स्वप्न माझेतुझी कूस मिळता खुशी सारी मिळतेउराशी उरावे कसे स्वप्न माझेतुझा गंध गात्री तुझे रुप डोळांतुझ्या सोबतीने फ़ुले स्वप्न माझेति मिठी चुभन काळजापार गेलीमिठी घट्ट होता मिटे स्वप्न माझेतुला अर्पुनी मी सुखाने जगावेअसा मंत्र माझा असे स्वप्न माझेस्वरांगी तुझी रे तुझी रे स्वरांगीतुझ्या वीण दुसरे नसे स्वप्न माझेअसे स्वप्न माझे तसे स्वप्न माझेतुझ्या भोवताली वसे स्वप्न माझे
No comments:
Post a Comment