आयुष्याच्या संध्याकाळी कधी बसावं एकल्या खिडकीत,असंख्य आठवणींचे अनमोल मोती साठवुन ओंजळीत.कधी गुलाबी, कधी निळा, कधी तांबुस तर कधी हिरवा,अंगणभर सांडलेल्या हर एक क्षणाचा रंग नवा.कोणता क्षण सोन्याचा, तर कोणता अमृताचा,मनी जपलेल्या एखाद्या कडु-गोड आठवणीचा.रुप्याचं चांदणं लेवुन काही घटका अल्या होत्या,'न लागो द्रुष्ट सुखाला' म्हणत पापण्या ओलावल्या होत्या.होता कधी कडक उन्हाळा, कधी रिमझिम सरी,नजरभेट पहिली घडताना, ह्रुदयी कोमल शिरशिरी.तारुण्याचा उल्हास, कधी विरहाचा आवेग,आंनदाच्या डोही कधी उदास उदास उद्वेग.प्रत्येक क्षणाची कविता नवी, प्रत्येकाचा सुगंध नवा,भेटेल त्याला प्रकाशत, जीवनभर जळत राहिला दिवा.असं सगळं आठवुन झाल्यावर, थोडं समाधानी हसावं,शेवटच्या को-या पानावर मग, थोडं नवं काहीतरी लिहावं.
No comments:
Post a Comment