खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावीआपणही मग तिच्या खांद्यावर हात टाकूनतिला एक गंमत सांगावीखरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावीलटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावीआणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावीखरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....आपले सगळे सिक्रेट जाणणारीजीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावीआई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावीखरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावीहातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावीअन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाही अधिक जवळची व्हावी
No comments:
Post a Comment