सगळ्या प्रेमकथांची सुरुवातगोड बोलण्यानंच होतेसगळ्या प्रेमकथांची अखेरमटार सोलण्यानंच होते!प्रेमात दोघं असतात तेंव्हासगळं गुलाबी वाटत असतंएकमेकांना प्रेमानं दिलेलंपाणीही शराबी वाटत असतंप्रेमकथांची सुरुवात अशीचपाण्यानंही झिंगून जाण्यानं होतेप्रेमकथांची अखेर मात्र(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा'हात' एकमेकांसाठी धरले असतातदोघंजणं एकमेकांसाठीराजा-राणी बनले असतातप्रेमकथांची सुरुवात अशीचएकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होतेप्रेमकथांची अखेर मात्रएकमेकांना झब्बू देण्यानं होते!प्रेमामधे एकमेकांबद्दलजे जे काही कळलं असतंसंसारात त्याच गोष्टींवरूनएकमेकांना छळलं जातंप्रेमकथांची सुरुवात अशीचकळूनही न कळण्यानं होतेप्रेमकथांची अखेर मात्रछळून छळून छळण्यानं होते!एकमेकांच्या वागण्यामधेआपल्याला फक्त चुका दिसतातएकमेकांच्या शब्दांमधेचाबूक आणि बंदुका दिसतातजे जे होणार नाही वाटतंते ते सारं घडत जातंप्रेमकथेच्या शेवटी शेवटीसारं सारं बिघडत जातं
No comments:
Post a Comment