ती आली...तिनं पाहीलं...जाणलं माझं मन...जिंकलं तिनं मला......हळूवारपणे माझ्या मिठीत शिरुन, होकार दिला तिनं मला....माझ्या डोळ्यातून ओघळलेले समाधानचे अश्रू;तिच्या केसांत मुग्धपणे विरुन गेले....तिच्या कुशीत मात्र मग; अस्तित्व माझे हरवून गेले....मावळतीच्या सुर्यानेही क्षितीजावर, गुलाबी रंगाचा घडा फोडला....तिच्या अन् माझ्या भावनेचा, कायमचा संबंध जोडला....मी झुकलो तिच्यासमोर, अन् गुडघ्यांवर कोसळलो....ओंजळीत तिच्या चेहरा लपवून, मनसोक्तपणे रडलो....मग जखडले मी तिला बाहूपाशात;तिच्या श्वासात माझा श्वास मिसळला....भिडले ओठांशी ओठ, प्रेमाचा खरा अर्थ मला कळला....हळूवारपणे दूर लोटून मला, तिनं ओंजळीत तोंड लपवले....माझ्यावर प्रेमळ कटाक्ष टाकून, मलाही निःशब्द केले....तरीही डोळे बोलत राहीले, भावनेच्या मर्यादा तोडून....पुन्हा ती माझ्या मिठीत सामावली, समाजाची बंधनं मोडून....
No comments:
Post a Comment