मोकळा वेळ असताना,गच्चीवर येऊन बसावं..कुणीही बघत नसतं,स्वतःशी कितीही हसावं !या उंच जागी बसून,खाली तुच्छतेने बघावं..पक्ष्यांकडे बघून मात्र,परत निराश व्हावं !जवळच्या आंब्याच्या शेंड्यालाप्रेमाने आलिंगन द्यावं..नजरेनेच समोरच्यारस्त्याच्याअंतापर्यंत जावं !हवं तितकं नाचावं,हवं तितकं बागडावं..पण हे सारे खेळखेळण्यासाठीखालचं घर मात्र “आपलं” असावं !
No comments:
Post a Comment