पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावरमेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावरसरी धावून येतील रानं जळून गेल्यावरसुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावरशब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावरभिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावरपुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावरकळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावरकळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावरतुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावरपुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावरतुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधीपण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.
No comments:
Post a Comment