मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनासकाटयातच मग खुडावं लागतं.....कुणाला कुणी असं सोडुन का जातं ?होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतंबरसतानाच नकळत हरवुनही जातंभर चांदरा तीही मनास मगएकट्यालाच झुरावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?कुणास कुणी कधि आपलं म्हणु नयेझालात कुणाचे कधि तर दुर जाउ नयेवाळवंटी या जगातएकट्यालाच मग जगावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?मी जगुन घेतो एकटामाझ्याशीच मी हसुन घेतो एकटातरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
No comments:
Post a Comment