मला स्वप्न खूप आवडतातवास्तवाशी संबंध नाही कशाचेच बंध नाहीत ....खोटी असली तरी धीर देतातथकल्या भागल्या जीवाला बळ देतात ....मला स्वप्न खूप आवडतातमला धुकही खूप आवडत ....खूप खूप सुरक्षित वाटत त्याच्या आवरणातफार लांबच दिसत ही नाही ...आणि धुक्याच्या ओलेपणातडोळ्यात आलेल पाणी कोणाला कळतही नाही ...मला धुकही खूप आवडत ....मला तू ही खूप आवडतेसमला माहित आहे मी तुला अजिबात आवडत नाही ....तरीही मी स्वतःला रोखु शकत नाही ....तू नसलीस तर स्वप्नही पडणार नाहीत ...आणि मग धुक्यात विरून जायला कितीसा वेळ लागेल???
No comments:
Post a Comment