Friday, August 22, 2008

मनापासून

मनापासूनमला कळेना कसे घडे हेकळे तुला गं माझ्या मनीचेजसे कळे गं सहजपणानेजीवा घ्यावया श्वास,गंध तुझा गं मोहवे मलाश्वास तुझा गं जाणवे मलाकाही न सुचते काही न रुचतेफक्त तुझा मज ध्यास ....अगदी माझ्या जवळ असूनहीहाक मारलीस नाही कधीमी ही करंटा, अबोल प्रीतीतुझी मज कळली नाही कधीआणि गर्द अंधारी एकदा चुम्बिलेस नयनासहातात घेउन हात म्हणालीसकिती रे तू थकलास ......ज्या ज्या वेळी भेटलीसभारून टाकले तू मजलाशब्दावाचून माझी भावनामूकपणे कळली तुजलाआज जाणले सखी तुलासंपले सर्व आभासव्यर्थ वाटती सर्व सूखेअन लौकिकाची आरास ......दुःख वाटते एवढेच ...मी देऊ न शकतो काही तुलाव्यवहारिकतेच्या जगात या गंकोण विचारी तुला मलाखंत न वाटे याची मलाये श्वासात मिसळू दे श्वासपूर्णत्व काय असणार दूजेमाझ्या गं जीवनास .......

No comments: