Wednesday, August 13, 2008

मला तर हवा असतो फक्त पाउस..

मला तर हवा असतो फक्त पाउस,तुलाच लागते छत्री - रेनकोटमला आवडत चिंब भिजायलातुलाच लागत, आडोश्याला उभ राहायलामला आवडतो पाउस केसात मुरणारातुलाच लागतो रुमाल, केस पुसायलामला नाचावसं वाटत बरसणाऱ्या पावसाततुलाच लागते सिगारेट, भिजत ओढायलामला भुरळ घालतो घुमणारा वारातुलाच लागतो बंद खोलीचा किनारापण तरीही कधीतरी भिजतोस तु...माझ्यासाठी पावसात उतरतोस तुवाफाळलेला चहा सोडुन"अमॄत"धारा पितोस तु..खरच मनापासुन आवडतोस तु..जेव्हां पावसासारखा बरसतोस तु...जेव्हां माझ्यासाठी भिजतोस तु ..

िभजलॆला पाउस आज

िभजलॆला पाउस आजआसमंत उजळत आहेहात हाती सजना तुझामुक स्पर्श कळत आहे ………
सरला पाउस पानावरीथेंबसा ओरघळत आहेप्रीत भरला गंध बावरावार्यातुनी पाघळत आहे ……॥
अन् हृदयातले भाव बंधनजरेतुनी मीळत आहेनीवांत ओलावा येथधुंध मैंफिल जुळत आहे ………
िभजलॆला पाउस अनअमृतवर्षा उधळत आहेनवे स्वप्न सजना आपुलेओतप्रोत उजळत आहे ……………।!!!

पाह्यलायस कधी पाउस….. मनात पडणारा ?

पाह्यलायस कधी पाउस….. मनात पडणारा ?मी पाह्यलाय्…
पड पड पडतो आणि दुथडी भरुन वाहातो।डोळ्यात उतरला तर स्वप्न होतोगळ्यात उतरला तर गाण होतोबोटात उतरला तर सतार होतोआणि काळजात उतरला तर…।स्वातीचा शिम्पला होतो।मोरावर पडला की पिसार्‍यागत फुलतोरातराणीवर पडला की गन्धासोबत उधळतोवेळूच्या बनात खुळ्यागत पिसाटतोआणि अश्वत्थाबरोबर व्रतस्थ होतो।
पाह्यलायस कधी ? पाउस ……माझ्यावर कोसळणारा ?
माझ्यावर कोसळ्तो तेव्हा, तू होतोस।शतधारानी बरसणाराचहुअन्गानी वेढून टाकणाराबेफाम्, अनावर ……।तरीही मनातले सगळे सल……आपल्या उबदार ओठानीहळुवार टिपून घेणारा……
माझा लाडका…… पाउस !!!

भेटण्यास आलि तु.....

भेटण्यास आलि तु अनपाउस सुरु झाला होता,थांबण्यास मज जवळकिति सुंदर बहाणा होता.बाहेर पाउस, गारठा हवेत.आग देहात, कंपने ह्रुदयात.
कमनिय बांधा तुझा,धिर धरु किति,हा वेडा एकांतमनांस आवरु किति.
घडावयाचे विपरीत,नेमके तेच घडले.घेतले मिठित तुजलाभान आपले हरपले.
चुंबिता मधाळ ओठांनागालावर पसरली लालि,फिरता हात वक्षावरसारी तनु थरथरली.
भान नसे वसनांचे,देह नग्न मिठित असे,सोड ति सारी लाज,साथ प्रेम चेष्टेस दे सखे.
रमलो देहात आपणकाळांचे भान राहिले नाहि,पाऊस केंव्हाच थांबला होता,तिकडे लक्ष गेलेच नाहि.

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो..?

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो..?मला भेटण्याआधी तुलाच का तो भेटतो.?
कधी तुझ्या स्वप्नी, कधी लेखणिने बरसतोतरी तुझ्यासाठी तो उगाच का ग तरसतो...?
धाडीतो निमंत्रण तयास मीही यायचीपण मलाच पाहुनि तो कुत्सित का हासतो..?
तुला पाहुनि कसा तो सर सर सर कोसळतोमला मात्र नेहमी तो अबोल का ग वाटतो..?
तुझ्या अंगणी जणू तो मोती होऊन सांडतोमाझ्या अंगणात वेडा चिखल होऊन साचतो..!
अशी काय मोहिनी तू टाकलिस त्यावरीअनोळखीच दृष्टीने तो मला न्याहाळतो..!
त्यास ओढ मायेची जी तुझ्यात गवसतेम्हणूनि तो अधीर् होत येउनि तुज बिलगतो..!!
पाउस हा खूळयागत असा का ग वागतो ?मला भेटण्याआधी तुलाच का तो भेटतो..???

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

आम्हास वाटले….......आत्ता पाउस पडेल…..!रखरखत्या उन्हात काले ढग जमले…….पावसात भिजण्यासाठी मग मन रमले…...!अचानक एक वीज चमक्ली……आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!अंगाची लाही लाही होत होती…….मनात भिजण्याची तमन्ना झाली…..कुठून एक सर आली……आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!एक थेम्ब मग वरुन पडला तळहातावर…….ओंजलित घेउन मग त्याच्याकडे पाहू लागलोढग सरला……सूर्य तापलाथेम्ब वाफ होउन उडून गेला…….पुन्हा केंव्हातरी एक ढग येईल……मनास पावसाची चाहुल देईल…….अचानक वीज चमकेल……..आम्हास वाटेल……..आत्ता पाउस पडेल…..!आत्ता पाउस पडेल…..!

अशी असावी माझी प्रिया

अशी असावी माझी प्रियादिसायला तिने असावे छान,ती दिसताच होउन जावे सर्वांनी बेभानतिच्यात आणि माझ्यात कधीच नको वाद,फ़क्त आमच्यामध्ये असावा संवादतिच्या रोमारोमात भरलेली असावी शिस्तकारण तिच्यावरच आहे माझ्या आयुष्याची भिस्त अशी असावी माझी प्रियावडिलधा-यांचा ठेवावा तीने मानलहानांना तीने समजावून घ्यावे छानपैशाने नको असावी श्रीमंतपण तिच्या मनाचा मोठा असावा आसमंतकौटूंबिक जबाबदारितच तिने होऊ नये बेभान,सामाजिक कार्याचीही तिने ठेवावी जाणअशी असावी माझी प्रियाभावनांचा करावा तिने आदर मायेसाठीआसुरलेल्याला द्यावा तिने मायेचा पदरसुखाताच नव्हे तर दू:खातही तिने द्यावी मला साथतिने सोपी करून द्यावी माझी जीवनवाटमाझ्या आयुष्यात येउन तिने द्यावे आयुष्याला वळण तिने उजळवुन टाकावे माझे हे अंधार मय जीवन......!

फुलले रे क्षण माझे फुलले रे

फुलले रे क्षण माझे फुलले रेमेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीनेसजले रे क्षण माझे सजले रेझुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुलेसाजण स्पर्षाची जाणिव होऊन, भाळले मन खुळेया वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरेमेंदीने, शकुनाच्या मेंदीनेखुलले रे क्षण माझे खुलले रेओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझेभांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझेमन मोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारेमेंदीने, शकुनाच्या मेंदीनेहसले रे क्षण माझे हसले रेरीत ही, प्रीत ही उमजेनाजडला का जीव हा समजेनाकशी सांगू मी, कशी सांगू मीमाझ्या मनीची कथा रेमेंदीने, शकुनाच्या मेंदीनेभुलले रे क्षण माझे भुलले रे

नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हाजीव तुटका तुटका होतोजगण्याचे विरती धागेसंसार फाटका होतोनभ फाटून वीज पडावीकल्लोळ तसा ओढवतोही धरा दिशाहीन होतेअन्‌ चंद्र पोरका होतोयेतात उन्हे दाराशीहिरमुसून जाती मागेखिडकीशी थबकुन वारातव गंधावाचून जातोतव मिठीत विरघळणाऱ्यामज स्मरती लाघववेळाश्वासाविण ह्रुदय अडावेमी तसाच अकंतिक होतोतू सांग सखे मज कायमी सांगू या घरदारा ?समईचा जीव उदासमाझ्यासह मिणमिण मिटतोना अजून झालो मोठाना स्वतंत्र अजुनी झालोतुजवाचून उमगत जातेतुजवाचून जन्मच अडतो !

थांबते मी रोज येथे

थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हातीमधुर स्वप्ने मीलनाची, लाविती मज वेड का ती रंगवीण्या स्वप्न माझे, पाहिजे मज तूच रेरंगणे ना रंगवीणे, ते तुझ्या हाती अळविते मजला तया मी, टाकिते झिडकारुनी अळविते तुज तान भरुनी, याचनेची रागिणी ऐकणे ना ऐकणे रे, ते तुझ्या हातीउपवनी सुमने उमलती, भ्रमर ते मधुगंध लुटती हृदय-पुष्प तुला दिले, जे एकदा उमले चुंबणे ना चुंबणे रे, ते तुझ्या हाती

जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?

जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणीजे मी मुकेपणि बोलतो शब्दात ते रंगेल का ?हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलोजे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ?माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गेसर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का ?

उप-या श्वासांच जगणं....

तु मला भेटताना,माझ्याच कवितेचं रान निवडावं,मी ही त्या आभासात नेहमी,तुला माझ्या मिठीत पहावं.....
तू नेहमीच चित्राच्या चौकटीत,स्वत:ला शृंगारताना पहावं,मी ही त्या चित्राला तुझ्यासाठी,रंगाच्या विविध छटांमधे रंगवावं..
तू माझ्या संगीताच्या सुरात,हलकसं झुलून घ्यावं,तुझ्या त्या स्मितहास्यासाठी,सप्तसुरांच्या तालात तुला वर्णावं..
तूझ्यावर बरसाव्या सरी बाव-या,म्हणून मी श्रावणहरी व्हावं,अंगखांद्यावर तुझ्या बरसूनी मग,पुन्हा स्वत:ला लुप्त करावं...
कधी तुला वा-याच्या वेगात,तर कधी तुला लाटांमधे पहावं,किना-याची आठवण काढून,हात फैलावून तुझी वाट पहावं....
हे सारं असच का कल्पना विश्वात घडावं ?कधी वाटलं मला तर मी तुझ्या खांद्याविनाच रडावं?सांग सखे मला तूच आता एकदा,तुझ्याविना मी इथे रोज रोज का उप-या श्वासात जगावं...

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार....
असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार....
असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार....
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार....
असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार....
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार....
असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार....
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..असाव कुणीतरी...................

शब्दांपलीकडची भाषा आपण विसरून चाललो

माणसे नुसत्या स्मिताने बोलतात. डोळ्यांनी बोलतात्. स्पर्शाने बोलतात्,झाडांवर नुकते उमललेले फूल आपल्या रंगगंधाच्या भाषेत आपल्याशी बोलत असते. शेपूट हलवणारा कुत्रा आपल्याला ओळख देत असतो. पाळण्यातले तान्हुले जेव्हा कुणाला बघून हात पाय आनंदाने नाचवते,तेव्हा तेही त्याच्या भाषेत समोरच्या माणसाशी बोलतच असते.झादांची सळसळती पालवी, आभाळात भरून आलेले ढग, वार्याची हळुवार झुळूक या सर्वांची एक भाषा असते. ती शब्दहीन असते, पण फार बोलकी, फार अर्थपूर्ण असते. सतत ठणठणाट करणार्या कर्कश शब्दांच्या कोलाहलात ही शब्दांपलीकडची भाषा आपण विसरून चाललो

आठवणींनी व्याकूळ मन

आठवणींनी व्याकूळ मन
तुझ्या मिठीत सुखावले
कसे सांगू किती सुख
या विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचे
काय करू वर्णन
नजर मिळता नजरेला
धडधडू लागले मन
लटका राग लटके भांडण
सर्व काही गेले विसरून
स्पर्श तुझा होताच
झली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हात
काय वर्णू ती सायंकाळ
समुद्रांच्या लाटांसवे
पुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आले
पाहिले, निघण्याची वेळ झाली
आता येतील विरहाचे क्षण
याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आला
डोळे भरून आले
प्रियकरा,तुझा निरोप घेताना
मनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षण
खूप महत्त्वाचे असतात
पुन्हा भेटण्याच्या आशेने
आयुष्याला नवा अर्थ देतात.....

सहवास…सारा सुखाचा हव्यास


सहवास…सारा सुखाचा हव्यास
सहवास…सारा सुखाचा हव्यास
सहवास अडकवतो
एकान्त छळतो,
सॆरभॆर आयुष्य
कशासाठि कळेना………
विश्वासातून नाईलाज, कि
नाईलाजाने विश्वास?
आवासलेले प्रश्न...
उत्तर मात्र मिळेना…
गूंतलेल्या भावना, का
भावनांचाच गुंता
सा-या विवस्त्र चिंता
सरणंहि जळेना……
खरतरं……….
सहवासातून आयुष्य
आणि आयुष्यासाठि सहवास…
सारा सुखाचा हव्यास
सुटता कुणा सुटेना………
बापुना डोयातुन माये पावसानी वाट
तान-भुक हरपुन बापु ढगाले पहात
वावरात पेरलेल माये जवाराच पीक
आसु बापुना डोयाले मना जीव कासावीस
माये इठ्ठल ग तुना कसा पावता पाईना
काया रंगबी ढगाले कसा चढता चढीना ?
निस्ता पिवळट झाला वावराचा कवडसा
हिरवट रंग कसा माये दिसता दिसेना ?
आज घाम लई येतो वर चिन्ह पावसानी
वारा गातु कशी ओवी, माये तुझ्याच मुखानी
पहिलाच थेंब माये गेला बापुच्या वठाशी
बापु पितुया पावुस जणु चातक उपाशी
आज नाचु दे गा माये, वावराच्या चिखुलात
वावरातुन व्हातया काया पाण्याच अत्तरकाल
इचारला व्हता माये प्रश्न इठ्ठलाला
आज पावुस धाडुन त्यानी दिलया उत्तर
{ डोयातुन - डोळ्यांतुन, तुना - तुझा, काया - काळ्या }

मनातील शब्दांची फुलपाखरे

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली …
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी …
मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली…
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी …
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !

………..मी तशीच

हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं
चुकून चुकलेल्या शब्दांनी बोलणं झालं माझं ………
काय करू ? अजुनही मी तिथेच आहे थांबुन
माझ्या डोक्यावर तसेच ढग ओथम्बुन …………
दुखाने भरलेले ………आठवणीने शाहारलेले……..
कितीदा वाटलं की आता असंच दूर जावं निघून खूप
जिथे तुझी सावलीही दिसणार नाही मला
आणि जिथे तुझा स्पर्श झालेला वाराही पोहोचणार नाही
पण झाले नाही असे कारन त्या क्षणीही माझा हात तुझ्या हातात
होता…………………………………
..……. तुझ्या स्पर्शाने भारलेला
दूर जाताना तू माझा हात धरलास
जाऊ नकोस मला एकटा टाकुन डोळ्यात पाणी आणून म्हणालास
मी तशीच अजुन स्तब्धं त्याच वाटेवर तिथेच
माझा हात धरून तू उभा ………..आणि मी तुझ्याकडे बघताना
हतबल आणि ………..मी तशीच

स्वप्न दे… विनवतो

माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला।
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येतेकधी रुसत येते
कधी... रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते...
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो

ससा आणि कासव



एक जंगल होतं। त्या जंगलात एक ससा रहायचा. फारच लहरी होता दिवसभर चरायाचं हिंडायचं एवढच त्याला काम. एक कासव पण होतं त्या जंगलात शांत स्वभावाचं. एकदा काय झालं ससा चालला होता रस्त्यानं तेवढ्यात त्याला कासव दिसलं आणि त्याला कासवाची फिरकी घ्याविशी वाटली म्हणुन तो कासवाकडे गेला आणि कासवाला म्हणाला की आपण एक शर्यत लावू. कासव म्हणालं बर चालेल पण करायचं काय ? ससा म्हणाला जो त्या डोंगरावर पहिल्यांदा पोहोचेल तो जिंकला. कासव म्हणाले ठीक आहे. दोघेही शर्यतीला तयार झाले. १,२,३ म्हणुन शर्यतीला सुरुवात झाली आणि ससा टूनुटूनु उडया मारित धावत सुटला आणि कासव मात्र हळूहळू चालत राहिलं. ससा फार दूर पोहोचला आणि एके ठिकाणी थांबला त्याला तिथं हिरवंगार गवत दिसलं, सश्यानी विचार केला कासव कितीही जलद चाललं तरी त्याला ईथं पोहोचायला फार वेळ लागेल, तेव्हा आपण या गवताचा थोडा फडशा पाडुयात आणि मग परत धावुयात. त्याप्रमाणे ससा गवत खाऊ लागला, गवत खाऊन त्याचं पोट भरलं आणि त्याला आळस आला म्हणुन तो जरा सावलीत पडला त्याला चांगलीच गाढ झोप लागली. कासव आपलं हळूहळू चालत होतं आणि ते पोहोचलं सश्यापाशी त्यानं पाहिलं की ससा गाढ झोपलाय ते आणि ते तसच शांतपणे पुढं निघून गेलं. आणि डोंगराकड़े वाटचाल करत राहिलं. संध्याकाळ होत आली होती आणि ईकडे सश्याला जाग आली त्यानी पाहिलं आणि म्हणाला अरे बापरे फारच उशीर झालेला दिसतोय कासव निघून गेलं काय पुढं? दुस-याच क्षणाला त्याला वाटलं की कासव एकतर मंद ते काय जाणार आहे आपल्या पुढं आणि तो डोंगराच्या दिशेने धावत सुटला. जसा तो डोंगरावर पोहोचला तो चमकलाच कारण कासव तिथं कधीच येउन बसलं होतं आन ससा शर्यत हरला होता.ईथ पर्यंतची गोष्ट तुम्हाला माहितच आहे आता ह्यापुढची सांगतो.मग सश्यान् चिंतन केलं मनन केलं की आपण का हरलो, याचं कारण शोधलं आणि तो परत कासवाकडे गेला आणि म्हणाला की आपण परत शर्यत लावू, कासवही तयार झालं आणि मग त्यानी शर्यतीला सुरुवात केली पण यावेळी ससा अजिबात कुठं थांबला नाही सरळ डोंगरावर जाउनच थांबला आणि त्यानं कासवाला हरवलं त्याला फार फार आनंद झाला होता. मग कास्वान् चिंतन केलं, मनन केलं आणि तो सश्याकडे गेला आणि म्हणाला की आपण परत एकदा शर्यत लावू ससा त्याला म्हणाला "तू मला काय वेडा समजलास का? एकदा हरलो म्हणजे काय परत परत थोडेच हरणार आहे मी." कासव त्याला म्हणाले लावून तर बघ, सश्याने विचार केला ह्याला हराय्ची फार हौस आलेली दिसते आपलं काय जातय लावुयात शर्यत असा विचार करून त्यानं सश्याला होकार दिला पण कासव सश्याला म्हणालं की या वेळेस रस्ता मी ठरवीन, ससा म्हणाला चालेल. कासव सश्याला म्हणाला तुला ती टेकडी दिसते आहे ना तिथ पर्यंत आपली शर्यत, ससा म्हणाला चालेल आणि शर्यत सुरु झाली आणि ससा धावतच सुटला, अजिबात थांबायचं नाही असा त्यान विचारच केला होता पण पुढे गेल्यावर अचानक ससा थांबला, कासव आपलं हळूहळू चालत सश्या जवळ पोहोचलं आणि तेही थांबलं क्षणभर, पण पुढच्याच क्षणी चालु लागलं आणि कासव निघून गेलं आणि शर्यत जिंकलं. कारण जिथं ससा थांबला होता तिथं नदी आडवी आलेली होती आणि अन सश्याला पोहोतायेत नव्हतं. मग सश्यान् चिंतन केलं, मनन केलं आणि तो कासवाकडे गेला आणि म्हणाला की मित्रा "ईथून पुढं आपण दोघे आयुष्याच्या शर्यतीत असेच चालत राहू, जिथं जमीन आडवी येईल तिथं मी तुला पाठीवर घेईन आणि जिथं पाणी आडवं येईल तिथं तू मला पाठीवर घे आणि यशाच्या शिखरावर पोहोचू."


काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात
तरीहीकायम साथ देत राहातात...
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात...
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात..
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटता............

मी कुठे पत्ते उघडले अजून

मी कुठे पत्ते उघडले अजूनमी तर "ब्लाईंड" गेम खेळतोयचाल खेळण्या आधीचामी तो "माईंड गेम" खेळतोयमी कुठे पत्ते उघडले अजूनआजवर फक्त आत्मविश्वास मानलेमी तर नोटांच्या बंडला घेऊन आलोअरे॥रे तुम्ही फक्त सुट्टे आणले?मी कुठे पत्ते उघडले अजूनतरी माझ्या विरुद्ध सारेचं कसेमी अज्ञान, मुर्ख, वेडा, अढाणीतुम्ही विद्वान असून कोरेचं कसेमी कुठे पत्ते उघडले अजूनआणि ते पिसलेही मी कधी होतेमग पत्ता टाकताना तुमची नजरआपाआपसात का खाते गोतेमी कुठे पत्ते उघडले अजूनतीन बादशाह, म्हणून सुखावलात का९९९% तुमचाचं विजय, पणमिळवण्या आधीच लडखडलात काउघडतोय मी पत्ते आता, पण"पॅक" करून तुम्ही डाव सोडता कादोन-तीन-पाच माझ्याकडे पाहूनएकमेकांची डोकी फोडता का?सारांशपत्ते असो वा जिवनविजयी टिळकं त्याच कपाळी लावतातजे पराभवाच्या खोल पोकळीतूनहीसंधी मिळताच बाजी पलटवतात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

तिला कळतच नाहीओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतंपण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येतमग मी माझी इच्छा फुलावरच भागवतोबुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतोपण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाहीबोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाहीमग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातंसगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातंकाही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाहीमाझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाहीती नाही म्हणेल याची भीती वाटतेती नाही म्हणेल याची भीती वाटतेपण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचंतिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचंकुणास ठाऊक?तिच्याही एखाद्या पुस्तकातमाझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

दिवस अखेरचा...

दिवस अखेरचा...आज अखेर तो दिवस आलाभेटणार शेवटचे प्रत्येकाला...ओठावर होते प्रत्येकाच्याच हसु...डोळ्यात मात्र भरलेलेकाठोकाठ अश्रु...कुणीझालेल्या चुकांची माफ़ी मागत होता....तर कुणीकेलेल्या मजा-मस्तीची उजळणी करत होता...आठवत होता प्रत्येकजणक्षण आणि क्षण...ते कॅन्टीन मधे बसणं,लेकचर बंक करणं,सिनेमाला जाणंनाहितर कॉलेजबाहेरच्या कट्ट्यावर बसूनटाईमपास मरणं...किती पटकनसारं काही बदललं......३-४ वर्ष निघुन गेलीहे आजच कळलं...व्हॅलेंटाईन डे अन फ़्रेन्डशिप डेयेतील अजुनहीपण मजा नसेल आज नंतरत्याला तशी....कितितरी आज इथे ह्या जागी सोडूनजावं लागणार...रोज सोबत राहणारे मित्र-मैत्रिणीआता कधीतरीच भेटणार....प्रत्येक जण आजचा हा दिवस जगून घेत होताकारण आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता....

अजून मी माझ्यातच जगते

अजून मी माझ्यातचजगतेकुठे किनारा धरतीमातेजाणिव नाही कुणास माझीप्रवास मी एकटीच करते...गुलाम जीवन खितपत मळलेनाव माझी धारेत डळमळेकुठली नाही दिशाच ठावीगांव कोठले मला न कळलेभाव भावनांचा बाजारीएकटीच मी दारोदारीविरक्त जीवन ईश्वर कोठेभक्त म्हणुन ना कुणी स्विकारीअजून मी माझ्यातच जगतेकुठे किनारा धरतीमातेजाणिव नाही कुणास माझीप्रवास मी एकटीच करते...

मी एकलाच जगतो

असा मी माझा स्वत:तच रमतोतुझ्या साठी मी एकलाच जगतोविचारांच्या भोवर्‍यात निर्झर असाकिनारा त्याचा उपराच ठरतोवसंतात श्रुंगारुदे निसर्गालाग्रिष्मात वृक्ष ओंडकाच दिसतोपांघरुनी चांद नभात तारकाभास्कर त्याला परकाच ठरतोनेत्राती तुझ्या प्रतिबिंबित कोणीह्रद्यच्या गावी वेगळाच असतो

एकलाच

प्रश्न पश्नांचे उत्तरदु:ख सुखाचे आधारमाझ्यासाठी मीच आताएकलाच दारोदारचांदण्यास चंद्र भारनेत्रातूनी संथ धारपरका आप्तजनातएकलाच मुक स्वरभावनांचा कोरा पुरस्वप्नांचाच स्वैर धुरमनास अनोळखी मीएकलाच दूर दूरकोण कोणाचा ईश्वरमाणुसकीचा संहारकुरवाळत दु:खासएकलाच जातो दूर

काल एक झाड पडले

काल एक झाड पडलेवठले होतेकुजले होतेपानांशिवायसजले होते......कोसळून पडलेउसळून पडले...पालिकेची माणसे आलीआपले काम करुन गेलीमी ओला कच्चआठवाचे पिशाच्च...लहानपणी खेळलो होतोझाडापाशी रडलो होतोझाड माझा भोज्जा होतालपण्याचा सज्जा होताझाड माझे स्ट्ंप्स होतेफ़ांदी... मंकी जंप्स होतेझाडापाशी भेटु बरकाझाडामागे थांबु बरकाझाडाविना वठलेल्याहीआज झालो आहे पोरका......कोसळून पडलं कोणं....झाड का मी ?उन्मळून तुटलं कोणं.....झाड का मी ?

माझ्यासाठी तू काय आहेस.....

कधी न पाहिले स्वप्नी,कधी न होते ध्यानी मनी,असे प्रेम तुझे मला लाभले,अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले॥माझ्या जिवनात आलीस तू अशी,की सारं काही बहरून गेलं,लोंखडाचं कणखर जगणं माझं,तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं॥तुझ्या मिठीचा आधाराने मला,नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली॥तुझा तो होकार माझ्यासाठी,आजही अविस्मरणीय असा आहे,तुझ्या हातात मी दिलेलं फुल,अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे॥तेव्हा कधी नजर ना लागो,आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला॥आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,तुझ माझ्या जिवनात असण्यावर,नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

अस वाटत ना.....

अस वाटत ना.....प्रेम करणार असाव कुणीतरी ,अन ते समजून घेणारही असाव कुणीतरी ,डोळ्यांत डोळे घालून बघणार असाव कुणीतरी ,अन त्यातला अर्थ समजावून घेणार ही असाव कुणीतरी ,काहीही न बोलता मनातल ओळखनार असाव कुणीतरी ,अन ते ओळखल्यावर लाजनार ही असाव कुणीतरी ,एकांतात बसल्यावर आठवणीत येणार असाव कुणीतरी ,अन आपल्या आठवणीत रडणार ही असाव कुणीतरी ,आयुष्याच्या वाटेवर सोबत चालणार असाव कुणीतरी ,अन चालताना हातात हात घेणार ही असाव कुणीतरी ,एखाद्या रम्य संध्याकाळी आपल्या जवळ येणार असाव कुणीतरी ,अन ''मला मिठीत घेना '' अस म्हननार असाव कुणीतरी ,खर च अस वाटत ना ......मला ही असच वाटत ...माझ्या कविता वाचून गालातल्या गालात हसणार असाव कुणीतरी ,अन त्या हसना-या व्यकतिला चोरून बघणार असाव कुणीतरी ....

मैत्री

काही नाती बांधलेली असतातती सगळीच खरी नसतातबांधलेली नाती जपावी लागतातकाही जपून ही पोकळ राहतातकाही मात्र आपोआप जपली जातातकदाचित त्यालाच मैत्री म्हणतात।जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहते ती मैत्रीफ़क्त मैत्री...........मोहाच्या नीसटत्या क्षणीपरावृत्त करते ती मैत्री,जीवनातल्या कडूगोड क्षणांनानिशब्द करते ती मैत्री,जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावललासाथ देते ती मैत्री,आणि जी फक्‍त आपली असते,ती मैत्री

निखारा

नियतीचा कसा हा वार झालावेचली जी फूले तो हार झाला आतल्या आत जळणारा निखाराबाहेरून कसा पूर्ण गार झालापुराव्या अभावी कायदा कसागुन्हेगारी पुढे लाचार झालामुकेपण धरून आला आक्रोशअश्रुंचाचआवाज फार झालाआधार देणारा खांदाच कसाखांद्यासाठी आज भार झालाहुंदकाच काय निघाला तिचाबघ्यांची गर्दी नि बाजार झालामोत्याशी दुरावताच शिंपलाजगाच्या नजरेत बेकार झालातू नजरेचा धनुष्य झुकावताचप्रेमाचा तीर आर पार झालाआजची पिढी नव्या विचारांनाकालचा सूर्योदय भंगार झालारद्दीला मोल आहे कळल्यावरमला विकाया आत्मा तयार झाला तू दगा देताच दगेबाज तोकाळजावरचा घाव यार झाला'माणूस' नावाचा त्याच्याकडूनचुकून विचित्र प्रकार झाला

आठवणीने दे

चंद्राने पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे,नभावर लुकलुकनारे तारे मात्र आठवणीने दे
बेधुंद करणारा रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे,जाताना एक मोगा-याची कळी मात्र आठवणीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे ,ओल्या मातीचा दरवळणारा सुवास मात्र आठवणीने दे
मुठी एवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे,माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे

तीर्थरूपांस

निरोपाच्या मंद घंटाकधीच्या रुणझुणताहेत कानातपाकुळलेला आनंदी निरोप.....त्याच वेळी उमजलं होतं आतून,आयुष्यावर पसरलेली उबदार मायेची पाखरहळूहळू विरत जाणार आहे म्हणून.......त्यानंतर आपण सगळे झगडलोतुमच्या आजाराशी..लढता लढता थकलातच तुम्ही;तरीही जिंकलात...पण आलीच अखेर ती वेळसुटकेसाठी अधीर तुमचा अशक्त श्वास.......गार कोमट पडत चाललेले तुमचे हात पाय.....विझत थकत चाललेली तुमची गात्र....कुठल्यातरी अनमिक भितीचा कापूस पिंजणारं तुमच विकल मन....घशाबाहेर न उमटणारे तुमचे अर्धेकच्चे शब्द......ते आम्हाला समजले नाहीत कीतुमच्या जीवणीवर पसरणारे बारीक मिष्किल हासू.....तल्लख मेंदूच्या कितीतरी खूणगाठी....सगळं सगळं संपणार आता हळूहळू....विरत गेलेल्या आयुष्याच्या वस्त्रालानाहीच कोणी ठिगळ लावू शकणार....हे सगळं होऊनही उरेलच की कितीतरी अजूनही-------तुमच्या लेकरांच्यात उतरलेल्या तुमच्या अनंत लकबी.......आजकाल दुर्मिळ होणार्‍या मूल्यांवरच्या निष्ठा.......आवडते संगीत;मनापासून ठरवून केलेले वाचन..........स्वत:वर किमान पैसा खर्च करण्याचा हव्यास.......अन्यायाविरूद्ध वळणार्‍या मुठी......पहाडासारखे व्यक्तिमत्व पुढे ठाकल्यावरआपसूक नम्र होणारा माथा.....चांगल्याचे कौतूक आणि चूकांना क्षमा........आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वावलंबनाचा ध्यास....आणि अजूनही कितीतरी ;चवीपरी इत्यादी......तुम्हीतर जिवंतच राहणार अहातआम्ही आहोत, तोपर्यंतम्हणून तर निरोपाच्या मंद रूणझुणार्‍या घंटाबदसूर वाटत नाहीत,या विचारांनी काळीज लक्कन हललंतरीही.........

आसवे मला त्याचं उत्तर द्यायची

आसवे मला त्याचं उत्तर द्यायचीमी वागलोच का असा ,जो तो विचारत होता.आसवे मला त्याचं उत्तर द्यायची,ज्याचा प्रश्न कधी मला पडत नव्हता.सांत्वना दाखवून ती म्हणाली,जे झाले ते छान झाले.तिच्या याच शब्दांनी,परत माझेच तर रान झाले.चुक माझी काय झाली,हाच विचार डोक्यात घुटमळत होता.आसवे मला त्याचं उत्तर द्यायची,ज्याचा प्रश्न कधी मला पडत नव्हता.ऐकले ना काही तिने,व्यथा जरी माझ्या ओरडल्या होत्या.मी गेल्यावर शब्दात माझ्या,लोकांना तिच्याच तर पाऊलखुणा सापडल्या होत्या.पडदा माझ्या नावावर पडला आणि,जो तो तिच्यामागे फिरत होता.आसवे मला त्याचं उत्तर द्यायची,ज्याचा प्रश्न कधी मला पडत नव्हता.

एक रंगीत गोड गोळी

काहीतरी भन्नाटसा शोध लावावाको~या कागदावर फक्त उजेड रंगवावाआकाशाला काखोटीला मारूनसरळ सूर्य गाठावाआजकाल असं काही वाटत नाही डॉक्टरमला काय झालंय?आजकाल ऑफिसच्या पार्किंग मधे सावलीत मिळावी जागाएवढंच वाटतं रोजडॉक्टर, मला काय झालंय?मला माणसाळायंच नाहीये डॉक्टर.बघा ना, असेल एखादी गोळी...पांढरी नाही, रंगीत असेलएक गोड गोळी......

उधार

थोडे शब्द हवेत उधार जरा देता का कोणी?चुकार माझ्या भावनांना गुंफुन देता का कोणी ?आहेत भावना माझ्या शांत निजलेल्याअगदी गवताच्या पातीवर अलगद पहुडलेल्याकोणी देता का शब्द जरा उधारहल्ली शब्दंशी खेळ खेळने मला काही जमत नाहीअन मग अंगणातील निशिगंध देखील फुलत नाहीन जाणे शब्दांचे माझ्याशी काय बिनसलेमज पामराच्या हातुन कसले तरी पातक घडलेभावनांच्या महासागरात जगण्यासाठी धडपतोयमी तरीही शब्दांनी साथ देण्या-याची वाट पाहातोय मी

काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे

सहनशिलतेचा येथे संग्राम आहेसमाजात माथेफिरुंचा सरंजाम आहेगवताची पाती सजली भयाण रातीकाजव्यांचा सूर्यास जणू शाप आहेशुरतेचे निशान फडकते रणांगणीपाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहेयल्गाराचा दबला आवाज येथेउगाच खोट्यांचाच चित्कार आहेजरी आज भयाण शांतता इथेयेणार उद्या मोठ वादळ आहे

जगलो असे जमले जसे!

काही असे काही तसे !जगलो असे जमले जसे!लाचार कधी झालो नाही,स्व कधी विकला नाही,हात कधी पसरला नाही ,पडले मनासारखे फासे!जगलो असे जमले जसे!गरिबिची लाज नाही,ऐश्वर्याचा माज नाही,सरळ मार्ग सोडला नाही,टाकले नाही घेतले वसे!जगलो असे जमले जसे!हवेत इमले बांधले नाही,म्रुगजळामागे धावलो नाही,शब्दात कधी सापडलो नाही,झाले नाही कधीच हसे!जगलो असे जमले जसे!भावनेत कधी वाहिलो नाही,वास्तवाला सोडले नाही,विवेकाला तोडले नाही,वागावे लागले जशास तसे!जगलो असे जमले जसे!वावगा हट्ट कधी नाही,तडजोडीला ना नाही,रक्त उगा आटवले नाही,सजवले क्षण छोटे छोटेसे!जगलो असे जमले जसे!काही असे काही तसे!जगलो असे जमले जसे!

कांगावा

जरी आम्ही वाटतो तुम्हाला बावळेते आम्ही शिवरायाचे प्रिय मावळेगांजले क्रुरतेने दीन दुबल्यांनाकरती कांगावा तेच काढुनी गळेजल्लोष भजन किर्तनांचा चाललावेड लावी भक्तांस रूप ते सावळेबियाणे पेरले तयांनी या भेदांचेकसे पिकणार त्या एकतेचे मळेवागले मगरूर होउनी या जगीपिंडास त्यांच्या नाही शिवले कावळे

दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय....

मोठे मंदिर,मोठे व्यवस्थापन,खूप भक्त,ज्याला त्याला भक्तित दंग होताना पहिलाय..हो आज मी एका मंदिरमधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय..एक गरीब,बायको आणिमुलंसांगे दर्शनासाठी आलेला.पहाटे चार ला उठून,आनवणी पायाने,आनवणी पोटने,रांगेत उभा राहिलेला.तोंडात भगवंताचे नाव जपत,एक एक पाऊल पुढे टाकत होता.एका हातात लहान मुलाला सांभाळून,त्याला आपली संस्कृती शिकवत होता.मधातच, मीएका श्रीमंताला,पूजा-याला पैसे देऊन,थेट त्या दगडाच्या मुर्तूचे पाया पडताना पहिलाय,हो आज मी एका मंदिरामधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय.म्हणे देवाला आमिर,गरीब,सर्वच सारखे असतात.खर असेल कदाचित,पणमंदिरात त्या देवाचे ही मालक ते पुजारी असतात.गरीबाणा दुरुनच हात जोडुनि जावे लागते,पैसा मोजला तर मात्र त्या दगडाच्या मूर्तीला,मग त्याचा माथा लागते।आज माणसालाच, त्या देवाचा,बाजार मांडताना मी पहिलाय.हो आज मी एका मंदिरामधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय.इथे प्रत्येकाच्या घरी साक्षात देव आहे,मी त्याना आई-वडील म्हणतो.आता कदाचित mom आणि dad हे नाव असतील.देव ही ज्या आई समोर नमतात,त्या आईलाच तीळ तीळ मारुन,मी लोकणा मंदिरात माथा टेकताना पहिलाय.हो आज मी एका मंदिरामधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय.

तूझ्या माझ्या गं घरात...!!!

तूझ्या माझ्या गं घरात...!!!आई.....तूझ्या माझ्या गं घरात...त्या आपल्या अंगणात...फुलं प्राजक्ताची सारी...मी गं दंग वेचण्यात ...साद घातलीस मला...गोड तूझ्या आवाजात...आले धावत-पळत...उधळे रांगोळी रंग....परत घाल ना आईतशीच साद गं आज....आंगणी बहरला का...तो पारिजात परत...तूझ्या डोळ्यातले दु:ख...माझ्या पदरात घाल...नको सांडूस आसू...माझ्या नयनी तु हास...

शिलालेख ...........गुरु

होय शिलालेखजुन्या काळात काहीमहत्वाचं काहीसंदगडावर कोरलेलं लिखाणजे आपण संग्रहालयातप्रदर्शनात ठेऊन झाकलंयका ,का ? म्हणुन असे...जुनं ते सोनं म्हणुन जपलंयपण मला ते कळलंयआता मी शिलालेख करीनजेव्हा जेव्हा जगण्याचानवीन दुष्टिकोण बदलेलत्या प्रत्येक शब्दाचामाझ्या अंर्तमनात शिलालेख करीनसत्य असत्याचा जेव्हा झोकांड बसेलतेव्हा कुढत बसण्यापेक्षामनातला तो शिलालेख पाहीनहोय मानलंय .......आता शिलालेख हाच गुरुगुरु होणं नेमक काय तर ?''गरज म्हणजे गुरु ''असे म्हटले आहे कोणी !!!आणि मला तर सदैव गुरुची गरज आहेप्रत्येकानेअसा गुरु करावाच ....जो सदैव साथ राहील...कारण,सत्य कितीही शाश्वत असलंतरीही ते अपुरच पड़तंतेव्हा .....सत्याला शाश्वताची जोड़ द्यावी लागतेतेव्हा शाश्वती हाशिलालेख देईल .....

अंतर

बरेच आहे बोलायाचे उद्या कदाचित् नसेलहीशब्दें आहे झाकायाचे मुकेपणी जे दिसेलहीशब्द बरे गं अर्थ सुचविती जसा आपणा हवा तसामौनाच्या गहिर्‍या वाटांवर मन हे भोळे फसेलहीश्वासाश्वासांहून बरे ना अंतर शब्दाशब्दांचे ?नकोच सलगी, कोणा ठावे? नाते अपुले रुसेलहीओळख नाही तितुकी अपुली, जरी अंतरी गाज उठेगृहीत नियती कुणी धरावी थंडपणे जी हसेलहीनकोस टाकू शब्द परंतू.. जोडू जैसे दुवा दुवाअदृष्टाच्या पटा- पथावर सोबत अपुली असेलही

अनामिक भटकंती....

आजही तु जगवून गेलासतुझ्या किना-यावर फ़िरतांनातुला अर्पण केलेलीशब्दचित्रे घेऊन आलसमाझ्याकडे...हट्टानेआणि म्हणालासदाखव मला पुन्हामाझीच चित्रेआणि क्षितीजाचाकॅन्व्हास घेऊन उभा राहिलासअन् मी दिङमुठहोऊन बघत राहिलोतुझ्याकडे.....-------तुष... (कवी)

बरं झालं, त्याचं लक्ष नव्हतं....!

परवा मला तो दिसला, त्याच्या बुरखेवाल्या बायकोबरोबर,बोकड दाढी, डोक्यावर जाळीची पांढरी गोल टोपी,किती वेगळा दिसत होता, पण मी ओळखलं।माझ्या भावाचा पर्यायाने माझा मित्र अन्वर होता।अत्यंत हुशार, नम्र,मितभाषी अन्वर।इंजिनिअरींगला विद्यापीठात पहिला आलेला,माझ्या आईबरोबर एकदा बसने प्रवास करत होते,त्याने पाहिलं. भर बसमध्ये आईला वाकून नमस्कार केला।आईला केवढं कौतुक वाटलं होतं त्याचं॥!बरं झालं आता त्याचं लक्ष नाहीयं॥माझ्या सासुबाईंना करेल का तो तसाच वाकून नमस्कार?पण हल्ली त्यांची मुलं शाळेत वंदे मातरमही म्हणत नाहीत म्हणे!आणि समजा नमस्कार केला असता, तरी सासूबाईंना रुचलं असतं?आधीच त्यांच कडक सोवळं ओवळं,सुनेचा मित्र ही कल्पना धक्कादायक॥आणि त्यात असला? मग तर..तो बदललेला दिसतोयं! माझंही तसंच आहे ना!बेकायदा बांधली गेलेली मशिद, रस्ता अडवून होणारा नमाज॥!आमचा विरोध....!तो येत असेल तिथे नमाज पढायला?कसा असेल तो आता?पण बरचं झालं,त्याचं लक्ष नव्हतं,अज्ञानात सुख असतं ना?(कवयित्री शैलजा)

मृगजळ.........

बन्द मुठ्ठित वाळुप्रयत्न पकडन्याचाबोटान्च्या सापटीतुनतिचा प्रयत्न निसट्न्याचावाळुत उमाट्लेल्या खुणातिकडे लाटा हसतातयेउन खुणाना त्यामिट्वुन निघुन जातातवाळुचे घर बान्धायचेक्षणान्पुरते आनन्दायचेकधीतरी कोसळ्नारह्या तयारीत रहायचेवाळु स्वता हलकीवार्‍याने जागा बदलणारीपाण्याजवळ आणिपाण्याशिवाय आढळ्नारीप्रयत्न वाळु पकड्न्याचावाळुत खुणा उमट्वण्याचाकधी कधी कोणी करतातआणि त्याची किम्मत चुकवत बसतातदिसते मृगजळ वाळुतचविसरतात बरेच जणवाळुचे इमले बान्ध्तातत्याखाली गाड्ले जातात....