मला तर हवा असतो फक्त पाउस,तुलाच लागते छत्री - रेनकोटमला आवडत चिंब भिजायलातुलाच लागत, आडोश्याला उभ राहायलामला आवडतो पाउस केसात मुरणारातुलाच लागतो रुमाल, केस पुसायलामला नाचावसं वाटत बरसणाऱ्या पावसाततुलाच लागते सिगारेट, भिजत ओढायलामला भुरळ घालतो घुमणारा वारातुलाच लागतो बंद खोलीचा किनारापण तरीही कधीतरी भिजतोस तु...माझ्यासाठी पावसात उतरतोस तुवाफाळलेला चहा सोडुन"अमॄत"धारा पितोस तु..खरच मनापासुन आवडतोस तु..जेव्हां पावसासारखा बरसतोस तु...जेव्हां माझ्यासाठी भिजतोस तु ..
No comments:
Post a Comment