Monday, November 23, 2009

होकार्-नकार

डोळ्यात तुझ्या आक्षेप होता
स्पर्शात हळु होकार होता
माझ्यासाठी आतुरलेला
असा तुझा पेहराव होता…
दार लोटताना हलके उघडा
ठेवला तु होता झरोका,
मीही म्हंटले वाट पाहु
मला सजा, तुझा तर खेळ होता…
डोळ्यांनी गातेस काय गुपचुप?
मी भला, देहात लपला बेबंद होता
आज होवो हे असे, ते तसे वा
मनास धरला हट्ट होता…
तो मगाचा आवेग तुझा मग
श्वास चढता आलेख होता,
हरवलो की गवसले? उरला
फक्त तुझा तो ध्यास होता…..

No comments: