Monday, November 23, 2009

एकतरी….

एकतरी ठिकाण असं असावं
जिथं मनातलं सगळं बोलता यावं
एकतरी कलश रिकामा असावा
जिथे सुकलं निर्माल्य वाहता यावं.
कुणीतरी थोडंतरी मोकळं असावं
साचलेलं सगळं ओतता यावं.
सांगता सांगता – ऐकता ऐकता
आभाळ खाली वाकुन वहावं…

No comments: