Wednesday, November 11, 2009

आयुष्य प्रवास

आयुष्य प्रवास
उसळणार्या सागरात विहार करताना साथ असावी त्याची
एकट्याने प्रवास करताना पाठीवर थाप असावी त्याची

त्या उसळणार्या लाटांची मजा घेताना सोबत असावी त्याची
लाटांच्या तुषारांनी भिजलेल्या त्याच्या मनाला ओढ असावी फक्त माझी

माझ्या येण्याची किनार्यावर बसून त्याने वाट पहावी
एका - एका क्षणामध्ये त्याला मला भेटण्याची आतुरता असावी

मला भेटण्यासाठी मन त्याचे व्याकूळ व्हावे
आणि शेवटी मला पाहिल्यावर त्याच्या व्याकुल्तेचे मग हास्य फुलावे.

हाथ माझा हातात घेऊन त्याने मग किनार्यावर चालत राहावे
मी अडखळे ले जरी कुठे अचानक .........
त्याने मग मला सांभाळावे .........

त्याच्या आधाराचा हाथ नेहमी माझ्या सोबत असावा
मला घेऊनच मग त्याने संपूर्ण आयुष्याचा प्रवास करावा.

No comments: