तू सोबत असताना..........
तू सोबत असताना, ऋतुंनीही कूस बदलावी
वसंतातल्या भास्कारासही मेघांनी शाल पांघरावी.....
तू सोबत असताना, श्रावणातला पाऊसही बरसावा
आपल्याला भिजवताना तो स्वत:च भिजून जावा....
तू सोबत असताना, सप्तरंगांची छटा दिसावी
इन्द्रधनुष्यासहि जणू आपुली इर्षा व्हावी ....
तू सोबत असताना, सप्तसुरांची उधळण व्हावी
चाफ्या प्रमाणे सुरकुसूमे ती, तुझ्या केसांत मी गुंफावी.....
तू सोबत असताना, मी तुझ्यात हरपून जावे
नयनांच्या प्याल्याने तुझे सौंदर्य पितच रहावे........
गुलमोहर फुलताना तुझ्यासोबतच पहावं
गुलमोहरासारख फूलन तुझ्यासोबतच जगाव .......
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment