सावळ्या रे....
दोन डोळ्याचे एक स्वप्न ,
मनी एक खंत,
तिला असेच मनी जपन,
जप-आणि मनी तिला,
लपवनारे,
सावळ्या रे....
तुझ्या डोळ्यात जे आहे,
भाव मज ठाव आहे,
नाव नकोच त्यासी,
तरी तुझेच भासी,
जरी भ्रमित सारे,
गीत हेच गा रे,
सावळ्या रे....
संकोचच्या पापण्यानी ,
अडवून धरले जे,
अश्रु आहेत माझे,
असून डोळी जलधारा,
जळ-जळ का रे...
सावळ्या रे....
प्रकाशत आशेचे कण-कण,
अंधारल्या जरिही आशा,
नको ह्या दिशाही,
कोणास उरल्यारे,
सावळ्या रे....
ही ओढ़ आहे कैसी,
खेळच वाटे सारा,
हूर-हूर बोचे मनी,
नयन संभाळे पारा,
पलायन हे कैसे,
स्वतःच सापडलाशि ,
दूर जात आहे ती,
धावनारे...
सावळ्या रे....सावळ्या रे....सावळ्या रे...
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment