Wednesday, November 11, 2009

तो क्षण

तो क्षण
आयुष्यातला तो क्षण किती चान  असतो
माझा हात जेवा त्याच्या हातात असतो

स्वप्नांचा झुला मनात नेहमीच झुलत असतो
माझ्या समवेत असताना तो नेहमीच बेभान असतो

दोघांचे हि श्वास मग स्थिरावलेले असतात
त्याच्या बाहुपाशात हात माजे जखडलेले असतात

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते
पण ओठान्पारीयंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते

हळुवार पाने मग माने आमची बोलत असतात
आयुष्यातल्या त्या सुंदर क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असतात

No comments: