Wednesday, November 11, 2009

मधुर नातं

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,

गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.... १

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,

अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,

त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३

आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा.!!

No comments: