Tuesday, October 27, 2009

इथली सकाळ सुंदर आहे

इथली सकाळ सुंदर आहे,
तापलेल्या मनातही,
सकाळचं ऊन ताजं आहे.
पानांचे रंग वेगवेगळे तजेलदार,
इथलं रानटी गवतही लच्छेदार,
पावसांत रंगीत छत्र्या कोट, वहाणारे पाट,
गुलाबी थंडीतल्या स्वेटरचा ठेवणीतला थाट.
उन्हाळा तप्त असला तरी,
संध्याकाळ सुखद आहे,
तिच्यासोबत वार्‍याची मंद झुळुक आहे.
इथली सकाळ सुंदर आहे.
इथली हवाच सुंदर आहे.
कुणाच्या घरी कुकरची शिट्टी,
मनांत वास दरवळत आहे.
कुणी म्हातारा फुलं वेचतोय,
केवळ टाईमपास की श्रद्धा?
की त्याला निसर्गाची आस आहे?
रस्त्यावर सगळे नियम धुडकावुन
मस्त बेफाम जाणारे ड्रायव्हर आहेत,
गाडीच्या मागे त्यांच्या
‘श्रद्धा-सबुरी’ची जाहीरात आहे.
उगाचच हॉर्न वाजवणारे,
बोनस म्हणुन शिवी हासडणारे,
त्रासलेल्या मराठी मनाचे प्रतिक आहेत.
सिग्नल तोडुन पुढे गेल्यावर
वळुन एखादीला पहाणारे रसिक आहेत.
आकर्षक ‘वस्तुं’ना आपला हक्क समजुन
डायरेक्ट धडकणारी क्षुद्र जमात आहे.
स्वच्छ रस्त्यावर विधीफुलं पसरवणारी
पाळलेली प्राणिजात आहे.
भर गर्दीच्या चौकामध्ये गुलाल वाहीलेला
अंधश्रद्धेचा वाढला भात आहे.
दर शनिवारी फेकलेले मिरची-लिंबु,
भुतं झाली स्वस्त, माणुस किती महाग आहे!
कुणाला तरी रस्ता ओलांडायला
मदत करणारा मदतीचा हात आहे.
आजोंबांचा हात धरुन नेणारी
पुढच्या पिढीची नात आहे . . .
मनापासुन सांगतो गड्यांनो,
इथली सकाळ सुंदर आहे.

कोणी गेलं म्हणुन…..

कोणी गेलं म्हणुन…..

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थाम्बवुन ठेवायच नसतं

जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लाम्बवुन ठेवायच नसतं

आठवनिंच्या वाटावरुण
आपल्या स्वप्नापर्यंत पोह्चायच असतं

आभालांपर्यंत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायच असतं

कसं ही असल आयुष्य आपलं
आयुष्य थाम्बवुन ठेवायच नसतं

दिवस तुझा नसेल ही, रात्र तुझी असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायच असतं

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगण मागायच असतं

कोणी गेलं म्हणुन…..

जेव्हा तु उदास असायचीस

जेव्हा तु उदास असायचीस
एखाद्या दुख:त खोलवर बुडायचीस
तेव्हा मी तुझ्या ओझरत्या
नजरेकडे पहायचो
ओठावर हसु ठेवत
मी वेड्यासारखा बडबडायचो
तेव्हा वाटायचं मला
कि मला आनंदात पाहुन
तु तुझं दु:ख विसरशील
माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील............

पण...

तेव्हा तु म्हणायचीस
"तुला काहीच कसं रे वाटत नाही?
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही??"

पण आता

जेव्हा तु नाहीस
मग या डोळयात आसु ठेऊन
मी सारखा तुझा विचार करतोय
वेदनेच्या प्रत्येक पावसात एकटाच भिजतोय
अजुनही मन माझ तोच प्रश्न विचारी
कि "तु मझि होशिल?"
माझी ही अवस्था पाहुन
उद्या कदाचीत तु परत येशील
तोवर माझे हे आसु पण सुकतील
तुला पाहुन माझे हे
हसु विसरलेले ओठ पुन्हा हसतील
माझ्या त्या हास्याकडे पाहुन तु पुन्हा

तेच म्हणशील

"तुला काहीच कसं रे वाटत नाही
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही..

माझ्यासाठी हे करशील ना?

माझ्यासाठी हे करशील ना?

भिजू नयेस म्हणून मी तुझ्यासाठी छत्री आणेन,

पण भिजण्याची गळ तू घालशील ना?

तुझ्याबरोबर मीही घाम गाळेन

पण एखादा थेंब टिपशील ना?

असाच खेचत राहिलास तर मी गुंतत जाईन

पण झालेला गुंता सोडवशील ना?

खांद्यावर डोके ठेवून अश्रू गाळेन

तेव्हा ओठांनी टिपून घेशील ना?

Saturday, October 10, 2009

मैत्री केली आहस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून ‘नातं ‘ कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते…फक्त जरा समजून घे ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक ‘नातं ‘ जप.. मध्येच माघार घेऊ नको

Friday, October 9, 2009

म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

बघ तिला सांगुन
कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.

कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.

कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही

असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…

शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…

म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन

तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन

राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन

पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन

“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन

बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन

एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन

आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन

मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन

एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन

लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून

कुणास ठाऊक?

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी

मुग्धा खोंड
दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी…

दु:ख म्हणाले ” दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी ‘स्टोरी’ सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही…

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो…

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला…
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का ‘सुख’ माझा
कुणाच्या ही नजरेत…”

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून…

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी

पुन्याच्या पोरी

पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

दिसायला असेल पडलेला प्रकाश जरी
मगावं स्ट्राबेरी तर मिळते मारी

कुनी असेल स्मार्ट तर कुनी असेल गोरी
जवल जाउन बघा यांची पाटिच कोरी

झाल्या किती मोठ्य़ा तरी एकतील लोरी
पेन्टहाउस ला जशी एक अट्याच मोरी

थोड्या आहेत बाभाळी अन थोड्याश्या बोरी
कुठलीही पोरगी तशी आहे फ़ाशीचिच दोरी

पुन्याचा पोरिंचा असतो हजारदा रीटेक
ब्याटींग करता करता उडालेली असते विकेट

TVS ची SCOOTY आनी BAJAJ ची SUNNY
श्याम्पू लावला तरी सुटत नाही फ़नी

बाहेर जाताना यान्चे तोंड असते झाकलेले
असावेत यान्ना स्वताचे वीकपॊईन्ट समजलेले

पोरिंना वाटते आम्हि पावसाच्या गारा
अग उडालेला फ़्युज तुमचा तुम्हि तुट्लेल्या तारा

सान्गायला सरळ असतात या पोरि वागायला पाजी
खानार्र्याने जपुन खावी हि कार्ल्याची भाजी

म्हनुन पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

एक ना एक दिवसतरी “माझी” करीन मी तुला

एक ना एक दिवसतरी “माझी” करीन मी तुला
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला

जिथे जिथे पाहतोय तु आणि फ़क्त तुच दिसतेस
नजरेस नजर देता खट्याळ हसतेस
तुझं बरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतेस
पण मग मीच कसा गं दिसत नाही तुला

तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?

एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला

आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी “माझी” करीन मी तुला

आयुष्य म्हणजे हेच असत……

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं…….

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं…येईल त्याला सोबत घेत जाणं…….

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची दु:ख विसरून दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणं…….

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं…….

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं……..

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं…….

माझे स्वप्नं माला हसतात

माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.

तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,

मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.

थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.

माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.

मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,

आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.

बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.

मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.

त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.

अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,

मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.

वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते…………

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

भावना मनाच्या कोणा न कळल्या ………….

शब्द बांधील ती प्रेम गुपिते
मी मुद्दामच नव्हती खोलली
उगवत्या मनाच्या स्वप्नांची
जणु ईच्छाच होती मावळली

तुझ्या आठवणीत तेव्हा
प्रत्येक रात्र मी जागवली
तुझ्या बरोबरच्या प्रत्येक
क्षणाला न विसरण्याची शपथ मी दिली

अविस्मरणीय त्या क्षणात आता
असहनीयशी वेदनाच फ़क्त ऊरली
त्या वेदनेची लहर मनाच्या
अंतरी खोलवर पोहोचली

आनंदाच्या गावची वेस जणू
आता खुप मागे राहीली
वाटतय ती भाग्यलक्ष्मी जणु
माझ्यावर कायमचीच रागवली

सहन मी एकट्यानेच केलं
तुझी सोबत जरी नसली
मन बिचांर एकटच जळांल
तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय….
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना……
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना… कण-कण मरतांना…….

खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत

खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत
चेहर्या वरील उधार हस्याने मनातील दुख नाही लपत
आशेच तू हसत हसत खूप खूप ब ड बडटेस
लक्ष नाही माझे पाहून हळूच आश्रू पुसतेस
खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत
हृदयाच्या खोल जखमा नाही भरत
आशेच तू मित्र मित्र म्हणत नेहमीच विषय बदलतेस
काही तरीच तुझे म्हणत वेडा मला ठरवतेस
खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत

तुझी वाट पह्न्यात मन दंग झाले आहे

वाटेवर आहे नज़र सदा
वाटते येशील आज उद्या
सतत तुझी आठवण
विचारत तुझ्या सतत मन
जे हाकेला तुझ्या ‘ओ’ देण्यास उतावले आहे
तुझी वाट पह्न्यात मन दंग झाले आहे

तू हसत हसत यावेस
प्रथम माझे नाव घ्यावेस
आलिन्गानस हात पसरावेस
मिठित तुझ्या येण्यास मन उतावले आहे
तुझी वाट पह्न्यात मन दंग झाले आहे

आलीस जवल की दूर करणार नाही
येना एकदा पुन्हा जाऊ देणार नाही
तुझ्यासाठी अनेक नवस बोलले आहे
तुझी वाट पह्न्यात मन दंग झाले आहे

आपण दोघे सुखात राहू
आनंदाच्या सागारत बेधुंद नाहु
दुख आपले विसरून जाऊ
सुखी संसाराचे आपल्या स्वप्न वीनले आहे
तुझी वाट पह्न्यात मन दंग झाले आहे

तुझी वाट पह्न्यात सूततो आहे धीर
लवकर येना ग़ झाला आहे उशीर
चिंतेने तुझ्या डोळे पानवाले आहे
तुझी वाट पह्न्यात मन दंग झाले आहे

तु परत येऊ नकोस

तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला…..

दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो…..

तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला…..

पण…
काहीही असले तरी……..

तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते……

तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय…

Tuesday, October 6, 2009

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….

नदी आणि सागर

नदी आणि सागर

एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.

वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.

असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.

शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.

पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.

सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.

तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली
अधुराच नदीविनाही सागर.

ती समोर असली की..

ती समोर असली की..

ती समोर असली की
शब्द पाठमोरे होतात
सांगायचे खुप असले तरी
शब्दच दिसेनासे होतात

पण आज मी ठरवले होते
तिला सर्व काही सांगायचेच
वेडया ह्या माझ्या मनाला
तिच्यासमोर मांडायचेचं

हसु नको पण मी
आरशासमोर राहुन तयारी ही केली होती
सुरुवात नि शेवट ची
पुन्हा पुन्हा उजळणी केली होती

सगळं काही आठवत असुन ही
मी गप्पच होतो
तिच्या हालवण्याने
भानावर आलो होतो

ती माझ्याकडे बघत राहिली
न मी तिच्यात हरवलो
खोटं नाही बोलणार मी
पण पुन्हा सर्व विसरलो

ती च मग बोलली
निरव शांतता मोडत
तुझ्या मनात काय आहे
मला नाही का ते कळत..

तुझ्यात मनातलं मी
कधीच वाचलं होतं
माझं मन ही नकळत
तुझं झालं होतं

आता मात्र मी
घेतला तिचा हाती हात
आयुष्याभरासाठी द्यायची
ठरवली एकमेकांना साथ

आता मात्र मला
सर्व काही आठवले
ती समोर असली तरी
आपसुकच सुचत गेले

ही अखेरची तुझी आठवण

ही अखेरची तुझी आठवण[Marathi Kavita]


ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही...

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच, हे अखेरचे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत...

आणि हे अखेरचे काही शब्द ,
फक्त तुझ्यासाठी...

पण यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार् नाहीत...

यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार् नाहीत...

ही अखेरची तुझी आठवण...
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार् नाही...!

अशी होती ती" [Marathi Poem]

अशी होती ती" [Marathi Poem]


थेंबा-थेंबाने पावसाच्या, अंग माझे शहारुन गेले
आगमणाने तिच्या माझे, आयुष्य सारे उजळून गेले

सूर्याच्या त्या तेजाने, डोळे माझे दिपून गेले
तिचा एका कटाक्षाने, देहभान हरपून गेले

टपोरे ते दवबिंदू, छान गारवा देऊनी गेले
तिचे निर्मळ हास्य जगण्याची, नवी उमेद देऊनी गेले

पाखरांची ती किलबिल, गीत देऊनी गेली
ती क्षणात आयुष्यात येऊनी, प्रित शिकवुनी गेली

पानांची ती सळ्सळ, मधूर संगीत देऊनी गेली
छाया तिच्या केसांची, मला आसरा देऊनी गेली

चाफेकळी जशी, क्षणा-क्षणास उमलत गेली
तशीच आमची प्रिती, हळू-हळू बहरत गेली

अशी ती " स्वप्नसुंदरी ", स्वप्नातून बाहेर आली
आईचा धपाटा पडताच पहाटे, प्रेमगाथा आमची संपली...... प्रेमगाथा आमची संपली

Jeevan [Marathi Poem]

Jeevan [Marathi Poem]


मृत्यु निघाला रे आज
गीत स्वस्तुतीचे गात
देण्या माझ्याशी टक्कर
आहे कोण या जगात

असो राजा किंवा रंक
सारे माझ्यापुढे फ़िके
जन्मलेल्या प्रत्येकाला
वेढे मरणाचे धूके


धुक्यातून मरणाच्या
नसे सुटका कोणाची
गाथा मग का ती गावी
अशाश्वत जीवनाची

प्रेम शतदा करता
जीवनावर ज्या तुम्ही
जिवनाची त्या बैठक
क्षणातच उधळे मी

क्षणभंगूर जीवन
मृत्यू हेच एक सत्य
सामर्थ्यापुढे माझिया
बाकी सारे सारे मिथ्य

आहे यादीमध्ये आज
आजी एक नव्वदीची
खूप जगली आयुष्य
वाट आता परतीची

अंधुकशी दृष्टी तिची
त्वचा सुरकूतलेली
भार वाहून वयाचा
आजी आता थकलेली

आजी बसलेली खिन्न
तिची नजर शून्यात
मृत्यू ठाकला समोर
परी तिच्या न ध्यानात

मृत्यू झेपावला पुढे
गुंडाळण्या गळा फ़ास
दचकले जिवनही
आता शेवटचा श्वास

परी कोणाचे हे हास्य
कानी आले आकस्मात
नाद मधूर ऐकता
थांबे मृत्यूचाही हात

आले कसे खळाळत
दीड वर्षाचे तान्हुले
चालत नि लुटूलुटू
आजीकडे झेपावले

खदाखदा हास्य त्याचे
काय हासण्याचा डौल
हासण्यात त्या खळाळे
लक्ष जिवनांचे बळ

गेली खिन्नता पळून
आजी खळाळून हसे
हासण्यात तिच्या आता
बळ जिवनाचे दिसे

बिचकून मृत्यू मागे
दोन पाउले सरला
बळ हास्याचे कळता
अहंकारही जिरला

मृत्यू पाही यादी पुन्हा
आता तिचे नाव नाही
जिवनाच्या बळाने या
थांबविले काळालाही

लपे हर्षात जीवन
आणि हर्ष जिवनात
अशा जिवनाचे बळ
करी मृत्यूवर मात

आज इथे एकटाच
मृत्यू फ़िरला माघारी
जन्म हेच एक सत्य
हाच भाव दाटे उरी

Mala Kai Tyache

Mala Kai Tyache


पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?


या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे

पुन्हा एकदा पावसात..



पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात.
तिची माझी झाली भेट..
त्या ओल्याचिंब दिवसात............

समोर मी दिवसताच
मना पासुन हसली ती...
उशीर का झाला??? म्हणत,
थोडीफार रुसली ती...

देताच नजर नजरेला..
थोडीशी... ती वरमली.
जवळ ओढून घेताच
थोडीशी....ती शरमली.

बाहेर पावसाची रिपरिप
झोंबणारा वारा.
चिंब मनं...चिंब तन...
आसमंत सारा.

अगदी नेमक्या क्षणी,
वीज सुद्धा कडाडली.
मिठी अधिक घट्ट होऊन
ओठापाशी स्थिरावली.

तिच्या ओठांशी.......
माझ्या ओठांचे.......
बंध अचानक जुळुन आले
कुणी तरी रसिकतेने...
त्यालाच चुंबन म्हणाले.

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात..
तिची माझी व्हावी भेट
एका ओल्याचिंब दिवसात

शोध



जीवनाच्या वाटा तुडवल्या मी हिंडत
कधी थकून चालत, तर कधी धावत-पळत
नेहमीच ते पवित्र सत्य शोधत
जे पैसे दिले तरी नाही सापडत
समजायचं म्हटलं तरी नाही कळत
मरुनही नाही जे मिळत
आपल्याला जिवंत ठेवतं तिष्ठत
जे एका काळ्या गुहेत असतं रडत
दर क्षणी होणाऱ्या दु:खाने कण्हत
बाहेर यायचा नाकाम प्रयत्न करत
जे आत्याचार केला तरी नाही मरत
वायु नाही मिळला तरी श्वास नाही सोडत
असतं ते कसंबसं जिवंत धडपडत
एका घुसमटलेल्या पाखरासारखं तडफडत
त्याच्या जुन्या यशाला स्मरत
त्याच्या अस्थित्त्वाचा दोर घट्ट धरत
स्वतंत्र इच्छा उराशी बाळगत
एका आशेची अतूरतेने वाट बघत
जेव्हा कळालं मला, माझा विश्वास होता तुटत
ते दडलेलं होतं तुझ्यात....फक्त तुझ्यात