मुग्धा खोंड
दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी…
दु:ख म्हणाले ” दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!
मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी ‘स्टोरी’ सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही…
मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो…
गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला…
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!
तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का ‘सुख’ माझा
कुणाच्या ही नजरेत…”
सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!
नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून…
जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment