अशी होती ती" [Marathi Poem]
थेंबा-थेंबाने पावसाच्या, अंग माझे शहारुन गेले
आगमणाने तिच्या माझे, आयुष्य सारे उजळून गेले
सूर्याच्या त्या तेजाने, डोळे माझे दिपून गेले
तिचा एका कटाक्षाने, देहभान हरपून गेले
टपोरे ते दवबिंदू, छान गारवा देऊनी गेले
तिचे निर्मळ हास्य जगण्याची, नवी उमेद देऊनी गेले
पाखरांची ती किलबिल, गीत देऊनी गेली
ती क्षणात आयुष्यात येऊनी, प्रित शिकवुनी गेली
पानांची ती सळ्सळ, मधूर संगीत देऊनी गेली
छाया तिच्या केसांची, मला आसरा देऊनी गेली
चाफेकळी जशी, क्षणा-क्षणास उमलत गेली
तशीच आमची प्रिती, हळू-हळू बहरत गेली
अशी ती " स्वप्नसुंदरी ", स्वप्नातून बाहेर आली
आईचा धपाटा पडताच पहाटे, प्रेमगाथा आमची संपली...... प्रेमगाथा आमची संपली
No comments:
Post a Comment