Thursday, September 11, 2008

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...आपलं जे असतं;ते आपलं असतंआपलं जे नसतं;ते आपलं नसतंहसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...आलेला मोहोर;कधी जळुन जातोफुलांचा बहर;कधी गळुन जातोपुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...कधी आपलं गाव;आपलं नसतंकधी आपलं नाव;आपलं नसतंअश्या परक्या देशात वाट नाही चुकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...पींजऱ्यात कोंडुन;पाखरं आपली होत नाहीतहात बांधुन;हात गुंफले जात नाहीतहे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...झाड मुकं दीसलं तरी;गात असतंन दीसणाऱ्या पावसात;मन न्हात असतंकळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...-मंगेश पाडगांवकर

एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.

एकामेकांशिवायआपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :आणि असा चालतो आशयाचा प्रवास.एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.मंगेश पाडगावकर.

जीव भरुन तुझे व्हावे एकदा. ---------- मंगेश पाडगावकर.

जीव भरुन पहावे तुला एकदारानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्याशुभ्र शुभ्र कळ्या होताना.जीव भरुन पहावे तुला एकदाअनिवार हाक प्राणात भरुन:मोर अंधाराचा थुईथुई भिजतानापिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.जीव भरुन पहावे तुला एकदाकळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणेमिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.जीव भरुन पहावे तुला एकदा.जीव भरुन तुझे व्हावे एकदा.---------- मंगेश पाडगावकर.

इतके दुर होतो? ---- मंगेश पाडगावकर

आठ ऒळीइतके दुर होतो???खरेच ठाऊक नव्हते,रितेच होते विणलेले श्वासांचे घरटे???निसर्गक्रमाची सोयिस्कर साधनेच नुसती????जवळपणात कधीच घडले नाही मोती???सावल्यांच्या अफवांत दोन झाडे उभी राहीली,पाने आली आणी पाने गळून गेली:चंद्र उगवला जेव्हा रिकाम्या फांद्यांमागेडोळ्यात बाहुल्यांत कुणीच नव्हते जागे.---------------------मंगेश पाडगावकर

भेट तुझी माझी स्मरते - मंग॓श पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाचीधुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना ताराआंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारातुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीतीनांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीतीतुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गालीओठांवर माझ्या त्याची कीती फुले झालीश्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वासस्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भाससुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाचीभेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाचीधुंद वादळाची होती, रात्र पावसाची- मंग॓श पाडगांवकर

एखाद्या दिवशी ... कदाचीत मलाच तुझी गरज असेल

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलंतर मला हाक मारमी वचन तर देत नाही की.....मी तुला हासवेनपण मी तुझ्यासंगे रडू तर शकतोएखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलंतर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोसमी वचन देत नाही की.....मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतोएखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेलमला बोलव आणि.....मी वचन देतो की…..मी शांत राहीनपण एखाद्या दिवशी तु बोलवलेसआणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....माझ्याकडे त्वरीत ये....कदाचीत मलाच तुझी गरज असेल ............

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........तुमचं लग्न ठरवुन झालं?कोवळेपण हरवुन झालं?देणार काय? घेणार काय?हुंडा किती,बिंडा किती?याचा मान,त्याचा पानसगळा मामला रोख होता,व्यवहार भलताच चोख होता..हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसंअसलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..मी तिला विचारल,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,इराण्याच्या हॉटेलात,चहासोबत मस्कापाव मागवलातेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खालीत्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडतपोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघतजीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......मग एक दिवस,चंद्र, सुर्य, तारे, वारे,सगळं मनात साठवलं,आणि थरथरणाऱ्या हातांनी ,तिला प्रेमपत्रं पाठवलंआधिच माझं अक्षर कापरंत्या दिवशी अधिकचं कापलंरक्ताचं तर सोडाच रावहातामधलं पेनसुद्धा होतं तापलंपत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,पाकिटावर तिकिट नव्हतं लावलंपत्रं तिला पोचलं तरिसुद्धातुम्हाला सांगतो,पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजेमनाच्या फ़ांदीवर,गुणी पाखरु येउन बसलंमी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवलीमी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...तसा प्रत्येकजण नेक असतो,फ़रक मात्र एक असतोकोणता फ़रक?मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं....... -मंगेश पाडगांवकर

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिलेहृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविलेपरंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविलेकधी न रडणार मी, पण मला तू रडविलेफ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणारपण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणारमाझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणारआणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणारफ़क्त एकच प्रश्न करतो,खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का.?

येत नाही.....

कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही प्रेम आणि स्वात्यंत्र हे विरूध्दार्थी शब्द आहेत पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही