एकामेकांशिवायआपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :आणि असा चालतो आशयाचा प्रवास.एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.मंगेश पाडगावकर.
No comments:
Post a Comment