कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही प्रेम आणि स्वात्यंत्र हे विरूध्दार्थी शब्द आहेत पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही
No comments:
Post a Comment